Shreyas Iyer : 'मला जे सांगितलं गेलं ते मी केलं...' टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर अय्यरची पहिली प्रतिक्रिया

Shreyas Iyer marathi news
Shreyas Iyer marathi newsesakal

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेचा भाग नाही. त्याऐवजी, आगामी इंग्लंड कसोटी मालिकेची तयारी म्हणून तो रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. अय्यरचे नाव टी-२० संघात नसताना निवडकर्त्यांनी अय्यरला रणजी खेळण्यास सांगितले होते, असे वृत्तांतून समोर आले. आता श्रेयस अय्यरने या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Shreyas Iyer marathi news
Ishan Kishan : IPL मुळे इशान किशनने टीम इंडियाची साथ सोडली? 'या' खेळाडूच्या आरोपाने उडाली खळबळ

आंध्र प्रदेशसोबत झालेल्या सामन्यात मुंबईने 10 गडी राखून मोठा विजय नोंदवला. या विजयानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, "हे बघ, मी फक्त सध्याचा विचार करतो. मला जो सामना खेळायला सांगितला गेला होता तो मी खेळला आहे (आंध्र विरुद्धचा रणजी सामना). मी आलो आणि खेळलो. माझ्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. माझे लक्ष येथे येऊन सामना जिंकण्यावर होते आणि आज आम्ही तेच केले."

Shreyas Iyer marathi news
Sumit Nagal Australian Open 2024: सुम‍ितने ऑस्ट्रेल‍ियन ओपनमध्ये रचला इत‍िहास! 1989 नंतर ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

सध्या श्रेयस अय्यर इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. तो पुढे म्हणाला की, "एकावेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. मी 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा विचार करत नाही. आता जो संघ निवडला गेला आहे तो फक्त पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये चांगली कामगिरीनंतर उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल."

पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाचा पूर्ण संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com