esakal | विराट कोहली भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार; तोडला धोनीचा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

विराट कोहली भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार; तोडला धोनीचा विक्रम

विराट भारताचा कसोटीतील सर्वांत यशस्वी कॅप्टन ठरलाय. अर्थात विराटनं या कामगिरीचं श्रेय टीमला दिलं आहे. विशेषतः गोलंदाजांचा उल्लेख करत विराटनं, त्यांच्याशिवाय हे यश शक्य झालं नसतं असं म्हटलंय. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २७ कसोटी विजय मिळवले होते. तर, विराटही २७ विजयांसह त्याच्यासोबत पहिल्या स्थानावर होता. दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर कोहलीच्या नेतृत्वाखाली २८ कसोटी विजय झाले आहेत.

विराट कोहली भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार; तोडला धोनीचा विक्रम

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जमैका : भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची दुसरी कसोटी २५७ धावांनी जिंकत धरल यश मिळवलंय. टीम इंडियाचा हा विजय विक्रमी विजय आहे. वेस्ट इंडिजला त्यांच्याच देशात व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम टीम इंडियानं केला आहे. कॅप्टन विराट कोहलीसाठीदेखील हा विजय महत्त्वाचा आहे. कारण, या विजयासह विराट भारताचा कसोटीतील सर्वांत यशस्वी कॅप्टन ठरलाय. अर्थात विराटनं या कामगिरीचं श्रेय टीमला दिलं आहे. विशेषतः गोलंदाजांचा उल्लेख करत विराटनं, त्यांच्याशिवाय हे यश शक्य झालं नसतं असं म्हटलंय. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २७ कसोटी विजय मिळवले होते. तर, विराटही २७ विजयांसह त्याच्यासोबत पहिल्या स्थानावर होता. दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर कोहलीच्या नेतृत्वाखाली २८ कसोटी विजय झाले आहेत. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर सौरभ गांगुलीचे २१ कसोटी विजय आहेत.

विराट सेनेचा विंडिजला व्हाईट वॉश

कॅप्टन्सी म्हणजे केवळ एक ‘सी’
विराट कोहली म्हणाला, ‘कॅप्टन्सी म्हणजे केवळ तुमच्या नावाच्या आधी सी लागणं असतं. सांघिक कामगिरी सर्वांत महत्त्वाची असते. कॅप्टन्सी हे एका चांगल्या टीमचे बायप्रोडक्ट असते. जर, आमच्या टीममध्ये जे बॉलर आहेत. ते बॉलर नसते तर, मला वाटत नाही हे शक्य झालं असतं.’ टीममध्ये मैदानावर कोणत्याही प्रकाराचा दबाव झेलण्याची क्षमता आहेत. तसेच तशा परिस्थितीतही सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो, असे कोहलीने स्पष्ट केले.

बुमराह म्हणतो खरी हटट्रिक विराटचीच

कोहलीला संघावर विश्वास
कोहली म्हणाला, ‘कसोटी क्रिकेटचा जो पॅटर्न आहे, त्याची आम्हाला आता चांगली सवय झाली आहे. जेव्हा आमच्यावर दबाव येते. तेव्हा आम्ही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. त्याचवेळी जेव्हा प्रतिस्पर्धी संघावर दबाव असतो तेव्हा आम्ही त्याच परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटते आम्ही खूप चांगला कामगिरी केली आहे. कसोटी संघ म्हणून आमची बांधणी चांगली झाली आहे. मला या टीमवर खूप विश्वास आहे.’

व्हिव रिचर्ड्स मैदानातच कोसळे; रुग्णालयात दाखल

बुमराह, हनुमानचे कौतुक
विराट कोहलीन जसप्रीत बुमराहच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. बुमराहने पहिल्या कसोटी पहिल्या डावात १ तर, दुसऱ्या डावात पाच बळी मिळवले होते. तर, दुसऱ्या कसोटी त्याने ६-१ असा अशी कामगिरी केली होती. बुमराहच्या या कामगिरीमुळे दोन्ही कसोटींमध्ये विडिंजचा डाव गुंडाळण्यात भारताला यश आलं. कोहली म्हणाल, ‘नव्या चेंडूवर अशा पद्धतीने उत्तम स्पेल टाकणारा गोलंदाज मी पाहिला नाही. तो फलंदाजाला स्विंग, टप्पा आणि लेंथने गोंधळून टाकतो. स्पिपमध्ये उभे राहिल्यानंतर हे मला जास्त लक्षात येते. तो एक परिपूर्ण गोलंदाज आहे.’ तसेच सहाव्या क्रमांकावर हनुमान विहारीसारखा उत्तम फलंदाज मिळाल्याबद्दल कोहलीने समाधान व्यक्त केले आहे. या मालिकेतून कायम मिळाले असेल तर, हनुमानसारखा खेळाडू आपल्या हाती गवसला आहे. त्याने दबावातही उत्तम खेळ केला. त्याचे खेळातील तंत्रज्ञान आणि शैली प्रभावी आहे. दोन्ही कसोटींमध्ये आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर त्याने तग धरला होता, असे मत कोहलीने व्यक्त केले.

loading image
go to top