

Viral Video
esakal
Viral Video: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा हंगाम रंगत आला आहे. अशातच आता विराट कोहलीला(virat kohli) “मला कॉल कर” म्हणणारा अमेरिकन यूट्यूबर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकन यूट्यूबर डॅरेन वॉटकिन्स ज्युनियर, जो आयशोस्पीड किंवा स्पीड नावानेही ओळखला जातो, तो आपल्या अतरंगी गोष्टींमुळे सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतो.
तो मूळचा अमेरिकेचा आहे आणि सोशल मीडियावर त्याचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत. तो ख्रिस्तियानो रोनाल्डोचा(Cristiano Ronaldo) खूप मोठा चाहता आहे. परंतु आता तो भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला “मला फोन कर” म्हणत असल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.