Roger Binny : 'स्वतःला सिद्ध करण्याची गरज नव्हती' BCCI अध्यक्षांचं कोहलीबद्दल मोठे विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Roger Binny on Virat Kohli

Roger Binny : 'स्वतःला सिद्ध करण्याची गरज नव्हती' BCCI अध्यक्षांचं कोहलीबद्दल मोठे विधान

Roger Binny on Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या जुन्या रंगात परतला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो योग्य वेळी फॉर्ममध्ये आला आहे. टीम इंडिया देखील त्याच्या फॉर्मचा फायदा घेत आहे. पाकिस्तानविरुद्धची नाबाद 82 धावांची खेळी असो किंवा नेदरलँडविरुद्धची नाबाद अर्धशतकी खेळी असो कोहलीची पारी अप्रतिम होती.

हेही वाचा: PAK vs ZIM Shoaib Malik : खुद्द शोएब मलिकने 'डेड बॉल'वरून बाबर सेनेला काढलं वेड्यात

कोहलीची ही अप्रतिम कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) नवे अध्यक्ष रॉजर बिन्नीही त्याचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. पहिल्यांदाच ते कोहलीबद्दल बोलताना दिसले. यासोबतच बिन्नी असेही म्हणाले की विराट कोहली अशा टप्प्यावर आहे जिथे त्याला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही.

हेही वाचा: Babar Azam : "झिम्बाब्वे लिहिता येईना अन्..." जुन्या ट्विटमुळे पाक कर्णधार होतोय ट्रोल

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन येथे सत्कार समारंभात एएनआयशी बोलताना, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, हे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते. कोहली ज्या पद्धतीने मैदानावर खेळत होता. हा एक उत्तम विजय होता. तुम्ही असे सामने कधीच पाहिले नसतील की ज्यात बहुतांश सामना पाकिस्तानच्या बाजूने गेला होता आणि तो अचानक भारताच्या कॅम्पमध्ये परत आला.

पुढे बोलताना बिन्नी म्हणाले, कोहलीला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नव्हती. तो एक दर्जेदार खेळाडू आहे. बिन्नीच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की भारतीय चाहत्यांनी विराटच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको होते.