विराटला चौथ्यांदा पॅव्हेलियन पाठविले 'या' ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झाम्पा याने वर्षात चौथ्यांदा त्याला बाद केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. शिखर धवन आणि केएल राहुल यांच्या शतकी भागिदारीनंतरही भारताचा डाव कोलमडला होता. कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर एकामागून एक फलंदाज बाद होत गेले अन् भारताचा डाव 255 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी शतके झळकावून सहज विजय मिळविला.

अभिनेता सिद्धार्थ म्हणतोय, भाजपवाल्यांनो सर्व 'विंडोज' फोडून टाका

जगभरातील कोणत्याही गोलंदाजाचा धैर्याने सामना करणारा विराट मात्र ऑस्ट्रेलियाच्या झाम्पासमोर निष्प्रभ ठरला आहे. एका वर्षभरात झाम्पाने विराटला चौथ्यांदा बाद केले आहे. 32 व्या षटकात विराट त्याच्याकडे 16 धावांवर असताना झेल देऊन बाद झाला. विराटला आतापर्यंत इंग्लंडच्या ग्रॅमी स्वान आणि श्रीलंकेच्या सुरज रणदीव यांनीही चार वेळा बाद केले आहे. विराटला विंडीजच्या रवी रामपालने सर्वाधिक सहावेळा बाद केलेले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच झाए रिचर्डसनने पाचवेळा बाद केले आहे. झाम्पाने चारवेळा त्याला बाद केले असले तर त्याच्याविरुद्ध विराटने 130 च्या सरासरीने 123 धावाही केलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli does not perform in front of Adam Zampa in Mumbai