IPL मधून बाहेर पडताच विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावुक मेसेज

राजस्थान विरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांसाठी भावुक मेसेज केला आहे.
IPL मधून बाहेर पडताच विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावुक मेसेज
esakal

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा 8 वा संघ ठरला आहे. आरसीबीने या हंगामात एकूण 16 सामने खेळले. त्यापैकी 9 जिंकले आणि 7 सामने हारले. राजस्थान विरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांसाठी भावुक मेसेज केला आहे. त्याची ती पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

IPL मधून बाहेर पडताच विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावुक मेसेज
Blog : हार्दिक पांड्या नावाचा फ्लेम बॉय आता 'मॅच्युअर' होतोय

आयपीएल स्पर्धेतीतून आरसीबी बाहेर पडताच विराट कोहलीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे आभार मानलं आहेत. यासोबत त्याने भावुक मेसेजदेखील केला आहे. चाहत्यांमुळं स्पर्धा खास ठरत असते. असे त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“कधी कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही, पण 12 वी मॅन आर्मी, तुम्ही अप्रतिम आहात, आमच्या मोहिमेदरम्यान आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. तुम्ही क्रिकेटला विशेष बनवता. शिकणे कधीही थांबत नाही,” अशी आशयाची पोस्ट ३३ वर्षीय विराटने केली आहे. तसेच, आयपीएल 2022 च्या मोहिमेतील फोटो देखील त्याने पोस्ट केले आहेत.

IPL मधून बाहेर पडताच विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावुक मेसेज
आयपीएल : गुजरात आणि राजस्थान यांच्यात आज शर्थीची झुंज

यंदाच्या सीझनमध्ये कोहलीने १५ सामने खेळले आहेत. त्याने आत्तापर्यंत ३३४ धावा केल्या आहेत. त्याने केवळ २ अर्धशतके झळकावली आहेत. तर तीनवेळा तो गोल्डन डकवर आऊट झाला आहे. विराटने आयपीएल कारकिर्दीत आत्तपर्यंत २२२ सामने खेळले आहेत. त्याने यादरम्यान, ६६६१७ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतक तर ४४ अर्धशतके ठोकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com