Video : किंग कोहलीने चाहत्यांची मने जिंकली...; पाक खेळाडूला दिली जर्सी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli

Video : किंग कोहलीने चाहत्यांची मने जिंकली...; पाक खेळाडूला दिली जर्सी

Asia Cup 2022 Ind vs Pak : टीम इंडियाने आशिया कप 2022 मध्ये आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी दोन चेंडू राखून पूर्ण केले. भारतीय संघाच्या विजयात हार्दिक पांड्या स्टार म्हणून उदयास आला. खेळात नेहमीच हार-जीत होत असते. हा सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफला आपली जर्सी दिली. यावेळी कोहलीने त्या जर्सीवर ऑटोग्राफही दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये कोहली पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाशी संवाद साधताना दिसत आहे.

हेही वाचा: Ind vs Pak : पाकिस्तानला टाईमपास नडला; ICC च्या नियमाचा भारताला फायदा

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्यामुळे संपूर्ण संघ 19.5 षटकांत 147 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 43 आणि इफ्तिखार अहमदने 28 धावा केल्या. भारतीय संघाकडून भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले.

हेही वाचा: IND vs PAK : भारत-पाक सामन्याने मोडले सगळे विक्रम, 'इतक्या' लोकांनी पाहिली मॅच

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकात केएल राहुलची (0 धावा) विकेट गमावली. यानंतर रोहित शर्मा (12 धावा) आणि विराट कोहली (35 धावा) यांनी संघाला 50 धावांपर्यंत नेले. त्यानंतर कोहली आणि रोहित लवकर बाद झाले, त्यामुळे भारताची धावसंख्या 3 बाद 53 अशी झाली. येथून सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा (३५ धावा) यांनी धावसंख्या ८९ धावांपर्यंत नेली. त्यानंतर सूर्या बाद झाल्यानंतर जडेजा आणि हार्दिक पांड्याने 52 धावा जोडून भारताला विजयाच्या जवळ नेले. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Web Title: Virat Kohli Gifts Signed Jersey Haris Rauf Pakistani Bowler Video Asia Cup 2022 Ind Vs Pak Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..