INDvBAN : 'एक ही दिल है विराट भाई, कितनी बार जितोगे!'

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

भारतातील पहिल्याच दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशी फलंदाज नुसतेच निष्प्रभ ठरले नाहीत, तर जखमीदेखील झाले.

कोलकाता : भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याला शुक्रवारी (ता.22) सुरवात झाली. आणि ईडन गार्डनच्या मैदानावर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मात्र, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या भारतीय त्रिकुटाने बांगलादेशची चांगलीच धूळधाण उडवली. ऐतिहासिक ठरलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या सुरवातीपासूनच टिच्चून मारा केला. आणि बांगलादेशचा निम्मा संघ 20 षटकांतच तंबूत पाठवला.

- मनू भाकरचा विश्वकरंडकात 'सुवर्ण'वेध!

एकीकडे बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतत असताना या दरम्यान एक घटना घडली. भारतातील पहिल्याच दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशी फलंदाज नुसतेच निष्प्रभ ठरले नाहीत, तर जखमीदेखील झाले. पहिल्यांदा लिटन दास शमीच्या उसळत्या चेंडूने जखमी झाला. त्याला मैदान सोडावे लागल्यावर राखीव म्हणून मेहदी हसन मिराजने फलंदाजी केली. त्यानंतर नईम हसनही शमीच्या गोलंदाजीवर जखमी झाला.

- INDvBAN : ऐतिहासिक कसोटीत ईशांतने केली 'या' विक्रमांची नोंद!

त्या वेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचे फिजियो नितीन पटेल यांना मैदानात पाचारण केले. आणि स्पोर्टमन स्पिरीट काय असते, ते कोहलीने दाखवून दिले. 23 व्या षटक टाकणाऱ्या शमीच्या एका उसळत्या चेंडू हसनला लागला आणि त्याने लगेच आपले हेल्मेट काढून टाकले.

- INDvBAN : रन-मशिनच्या नावावर आणखी एक 'विराट' विक्रम!

हे पाहिल्यानंतर बांगलादेशच्या फिजिओंनी मैदानात येणे गरजेचे होते. मात्र, हसन अगोदर खेळायला आलेल्या लिटन दासला दुखापत झाल्याने त्यांचे फिजिओ दासवर उपचार करत होते. हे जेव्हा कोहलीला समजले तेव्हा बांगलादेशी खेळाडूला प्रथमोपचार देण्यासाठी कोहलीने भारतीय संघाच्या फिजिओंना बोलावणे धाडले. कोहलीच्या या कृतीचे सोशल मीडियावरून खूपच कौतुक झाले. कोहलीने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीच्या प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक झाले. 

INDvBAN : ईडन गार्डनवरील ऐतिहासिक कसोटीचा पहिला दिवस भारतीयांचा!

बांगलादेशचा डाव संपल्यानंतर दास आणि नईम दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. त्या वेळी दोघांचेही स्कॅन करण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यावर त्यांच्या सहभागाविषयी पुढील निर्णय घेतला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli invites physio of Indian team to treat injured Nayeem Hasan