Virat Kohli On Shubman Gill : कोहलीने गिलवर उधळली स्तुतीसुमने म्हणाला, किंग अन् प्रिन्स हे तर...

Virat Kohli On Shubman Gill
Virat Kohli On Shubman Gillesakal

Virat Kohli On Shubman Gill WTC Final 2023 : इंग्लंडच्या ओव्हलवर उद्यापासून (7 जून) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू होत आहे. या सामन्यात भारताची रन मशीन विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विराट कोहली आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला असून तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध एका वेगळ्याच उर्जेने मैदानावर उतरत असतो. त्यामुळे कांगारूही त्याला टरकून असतात.

मात्र भारतीय क्रिकेटमध्ये आता अजून एक धडाकेबाज फलंदाज उदयास येत आहे. या फलंदाजाचे नाव आहे शुभमन गिल! चाहते तर विराट कोहलीला भारतीय क्रिकेटचा किंग तर शुभमन गिलला प्रिन्स असे संबोधत आहेत. विराट कोहली आणि शुभमन गिल यांची तुलना होत असताना आता विराट कोहलीने शुभमन गिलबद्दल आपले मत व्यक्त केले.

Virat Kohli On Shubman Gill
WTC Final Live Streaming : फायनल जिओवर पहायची की हॉटस्टारवर... जाणून घ्या एका क्लिकवर

विराट कोहली आयसीसीच्या एका व्हिडिओत म्हणतो की, 'शुभमन गिल हा माझ्यासोबत खेळाबद्दल खूप चर्चा करतो. तो शिकण्यासाठी खूप आतूर असतो. त्याच्याकडे त्याच्या वयाच्या मानाने अनेक चांगले स्कील्स आहेत. आमच्या दोघांमध्ये चांगलं नातं असून एकमेकांप्रती आदर आहे.'

कोहली पुढे म्हणाला की, 'मी गिलला त्याच्या वाढीसाठी आणि त्याची क्षमता ओळखण्यासाठी मदत करण्यात उत्सुक आहे जेणेकरून त्याला दीर्घ काळ सातत्यपूर्ण खेळ करता येईल. जेणेकरून त्याचा फायदा भारतीय क्रिकेटला होईल. गिल हा एक चांगला मुलगा आहे. तो अत्यंत चांगलं क्रिकेट खेळत आहे. त्याने आपला फॉर्म कसोटीत देखील कायम ठेवावा हीच इच्छा आहे.'

Virat Kohli On Shubman Gill
Rohit Sharma Playing 11 : प्लेईंग 11 नाही तर प्लेईंग 15... रोहितनं संघाला असं काय सांगितलं?

किंग कोहली आणि प्रिन्स शुभमन गिल या टॅगबद्दल विराट म्हणाला की, 'किंग आणि प्रिन्स हे पब्लिक आणि फॅन्ससाठी चांगलं आहे. मात्र मला वाटतं की एक वरिष्ठ खेळाडू म्हणून आम्ही युवा खेळाडूंना त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी मदत करणे हे आमचे काम आहे. गिल सारखे शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या युवा खेळाडूंना आम्ही काय शिकलो हे सांगणे गरजेचे आहे. गिल हा देशासाठी एक चांगला खेळाडू ठरेल.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com