WTC Final Live Streaming : फायनल जिओवर पहायची की हॉटस्टारवर... जाणून घ्या एका क्लिकवर

WTC Final Live Streaming
WTC Final Live Streaming esakal

WTC Final Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ WTC च्या गदेसाठी इंग्लंडमध्ये भिडणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही उद्यापासून (7 जून) ओव्हलवर सुरू होत आहे. दोन्ही संघ या एकमेव कसोटी सामन्यासाठी काही आठवडे आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाले होते. दोन्ही संघांनी कसून सराव करत वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.

ऑस्ट्रेलियाने WTC पॉईंट टेबलमध्ये 152 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. तर भारतीय संघ 127 अंक घेत दुसऱ्या स्थानावर राहिला होता. आता या दोन्ही संघात अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच WTC च्या फायनलमध्ये आली आहे तर भारतीय संघ हा सलग दुसऱ्यांदा WTC ची फायनल खेळत आहे.

दोन दिग्गज संघातील हा सामना इंग्लंडमध्ये होत असल्याने त्याचे कोणत्या चॅनलवरून लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे याबाबत भारतातील चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

WTC Final Live Streaming
Rohit Sharma Playing 11 : प्लेईंग 11 नाही तर प्लेईंग 15... रोहितनं संघाला असं काय सांगितलं?

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया WTC Final 2023 भारतात कोठे दिसणार?

ओव्हलवर होणाऱ्या WTC final 2023 चे भारतात आणि ऑस्ट्रेलियात थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. सामना हा भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजत सुरू होईल. सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या डिस्ने स्टार इंडिया टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार WTC final 2023 चे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलगु आणि स्टार स्पोर्ट्स 1 कन्नडा या चॅनलवरून होणार आहे.

WTC Final Live Streaming
WTC Final 2023 IND vs AUS : प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी... 'पाच' पथ्य पाळणार तोच WTC चॅम्पियन बनणार

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया WTC Final 2023 लाईव्ह स्ट्रिमिंग कोठे होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final सामना हा टीव्ही सोबतच डिजीटल प्लॅटफॉर्मवर देखील पहावायस मिळणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे डिस्ने + हॉस्टारच्या अॅप आणि वेबसाईटवरून करण्यात येणार आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला गेल्या काही सामन्यात पराभूत केल्याने त्यांचे पारडे किंचित जड आहे. मात्र भारतीय संघ गेल्या काही वर्षापासून आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. भारताने तीन सामन्यांच्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचा 2 - 1 असा पराभव केला होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com