
नवी दिल्ली : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने निवृत्ती घेताना तीन क्रिकेट फॉरमॅटमध्ये आता खेळणे शक्य नाही. क्रिकेटच्या अती ताणामुळे एका क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. दरम्यान, क्रिकेट जगतात क्रिकेटच्या ओव्हर डोस होत असल्याबद्दल चर्चा सुरू झाली. काही जणांनी बेन स्टोक्सच्या निर्णयावर टीका केली तर बऱ्याच क्रिकेटपटूंनी बेन स्टोक्सला पाठिंबा दिला. दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli) देखील आपला फ्युचर प्लॅन (Future Plan) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना उघड केला.
ज्यावेळी बेन स्टोक्सने अती क्रिकेटमुळे वनडेला रामराम ठोकला त्यावेळी चर्चा सुरू झाली ती भारताचा तीनही क्रिकेट प्रकारातील अव्वल फलंदाज विराट कोहलीची. क्रिकेट जगतात सर्वाधिक क्रिकेट कोण खेळत असले तर तो भारतीय क्रिकेट संघ आहे. व्यावसायिक दृष्ट्या भारतीय संघ सतत क्रिकेट खेळणे हे फायदेशीर आहे. मात्र या सततच्या क्रिकेटचा परिणाम खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेवर आणि मानसिकतेवर देखील होत आहे. त्यामुळे बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर भारतात देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
दरम्यान, फॉर्म हरपलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडे सर्वांची नजर वळली. विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडीज दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली. मात्र काहींच्या मते ही विश्रांती नसून त्याला नारळ देण्यात आला आहे. विराट कोहलीला संघातून डच्चू देण्यात आला आहे असे काहींचे मत आहे. दरम्यान, विराटच्या भविष्याबाबत चर्चा सुरू असताना त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आपल्या भविष्याबाबत काही संकेत दिले.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराट कोहली म्हणाला की, 'माझे पुढे उद्दिष्ट हे भारताला आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये विजयासाठी सहाय्य करणे हा आहे. मी संघासाठी काहीही करण्यास तयार आहे.'
विराट कोहलीचा बॅटिंग फॉर्म सध्या त्याच्या लौकिकास साजेसा नाही. विराट कोहलीन एजबेस्टन कसोटीत पहिल्या डावात 11 आणि दुसऱ्या डावात 20 धावा केल्या होत्या. त्यानंतर टी 20 च्या दोन डावात त्याला फक्त 12 धावा करता आल्या. इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत देखील तो 17 आणि 16 धावा करून बाद झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.