Virat Kohli T20 Carrer Over: इंग्लंडच्या मालिकेबरोबर विराट कोहलीची टी-20 कारकीर्द संपली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli T20 Carrer Over

ENG vs IND: इंग्लंडच्या मालिकेबरोबर विराट कोहलीची टी-20 कारकीर्द संपली!

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा काळ खूप वाईट जात आहे. एकेकाळी शतकी खेळी करणारा हा फलंदाज आता आपली विकेट वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये विराट पूर्णपणे फ्लॉप राहिला आहे. आता या मालिकेनंतर विराट कोहली पुन्हा टी-20 संघात दिसणार नाही, असे मानले जात आहे.(Virat Kohli T20 Carrer Over)

हेही वाचा: सूर्यकुमार यादवने ठोकले धमाकेदार शतक, रोहित-रैनाच्या यादीत समावेश

इंग्लंडविरुद्ध विराटची बॅट पुन्हा एकदा शांत झाली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट अवघ्या एक धावा करून बाद झाला, तर शेवटच्या टी-20 मध्ये विराटच्या बॅटने एक चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर 11 धावा केल्या.

भारतीय संघ व्यवस्थापक यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी योग्य संघ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्याने तिसर्‍या क्रमांकावर दीपक हुड्डाला आजमावले आहे. दीपक हुड्डा चांगलाच फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या होत्या.

हेही वाचा: ENG vs IND : इंग्लंडकडून अखेरच्या षटकात भारताचा पराभव, मालिका 2-1ने जिंकली

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 215 धावा केल्या. डेव्हिड मलानने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 77 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन 29 चेंडूत 42 धावा करून नाबाद परतला. हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांनी 2-2 तर आवेश खान आणि उमरान मलिक यांनी 1-1 बळी घेतला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत, विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र सूर्यकुमारने अवघ्या 48 चेंडूत शतक झळकावले. टी-20 मध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय ठरला आहे. इंग्लंडने शेवटचा टी-20 सामना 17 धावांनी जिंकला, भारताने मालिका 2-1 ने जिंकली.

Web Title: Virat Kohli T20 Carrer Over With England Series Team India Eng Vs Ind Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..