esakal | किंग कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन राहिल; BCCI चा मास्टर स्ट्रोक
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

किंग कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन राहिल; BCCI चा मास्टर स्ट्रोक

sakal_logo
By
सुशांत जाधव

BCCI on Virat Kohli Captaincy : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वामध्ये 'विराट' बदल होण्याच्या चर्चेला बीसीसीआयने पूर्ण विराम दिला आहे. क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारत विभागून कॅप्टन्सी देण्याचा कोणताही विचार बीसीसीआय करत नाही. टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात खांदेपालट होणार या चर्चेत काहीच सत्य नाही, असे BCCI खजिनदार अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात म्हणजेच टी-20 आणि वनडेतील कॅप्टन्सी रोहित शर्माकडे येईल, असे वृत्त चर्चेचा विषय ठरत आहे. या वृत्तामध्ये कोहीही तथ्य नसल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: 'विराटचं ओझं रोहितच्या खांद्यावर' TRP साठी स्टंट बाजी?

बीसीसीआयचे खजीनदार धुमाळ यांनी आयएएनएसशी संवाद साधताना यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विराट कोहलीच्या बाजूनं मास्टर स्ट्रोक लगावला. टीम इंडियातील नेतृत्व बदलासंदर्भात प्रसारमाध्यमामध्ये रंगणाऱ्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील नेतृत्व विभागून देण्यासंदर्भात कोणताही विचार बीसीसीआयने केलेला नाही. विराट कोहलीच तिन्ही प्रकारात टीम इंडियाचे नेतृत्व करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार?, विराट राजीनाम्याच्या तयारीत

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 विश्वचषकानंतर मर्यादीत सामन्याचं (टी20 आणि एकदिवसीय) कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे, अशी चर्चा चांगलीच रंगली होती. विराट कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्माकडे टी-20 आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकते या चर्चेचा जोरही चांगलाच वाढला होता. विराट कोहलीने या मुद्द्यावर रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटसोबत दीर्घ चर्चा केल्याचे वृत्तही काही प्रसारमाध्यमानी दिले होते. पण अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे बीसीसीआयचे खजीनदार धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे.

32 वर्षीय विराट कोहली यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे. पण आयसीसीच्या स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला सातत्यपूर्ण अपयश आले आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये जर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जेतेपदापासून दूर राहिली तर विराट कोहलीवर नेतृत्व सोडण्याची वेळ येऊ शकते, असे बोलले जात होते.

loading image
go to top