esakal | 'ला लीगा'मध्ये अनुभवता येणार प्रेक्षकांचा जल्लोष; मात्र कसा घ्या जाणून...  
sakal

बोलून बातमी शोधा

football

स्टेडियमध्ये प्रेक्षक नसले म्हणून काय झाले त्यांचा जल्लोष आणि गर्दी नसली तरी 'ला लीगा स्पॅनिश लीग' फुटबॉलप्रेमींना काहीही फरक पडणार नाही.

'ला लीगा'मध्ये अनुभवता येणार प्रेक्षकांचा जल्लोष; मात्र कसा घ्या जाणून...  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माद्रिदः स्टेडियमध्ये प्रेक्षक नसले म्हणून काय झाले त्यांचा जल्लोष आणि गर्दी नसली तरी 'ला लीगा स्पॅनिश लीग' फुटबॉलप्रेमींना काहीही फरक पडणार नाही. येत्या काही दिवसात पुन्हा सुरु होणाऱ्या या लीगचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या रसिकांसाठी पूर्वीसारखाच जशास तसा अनुभव मिळणार आहे. 

वाचा ः निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोठा दिलासा; पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश...

जर्मनीतील बुंडेस्लिगा लीगनंतर आता ला लीही पुनरामनाच्या वाटेवर आहे. दोन महिन्यांच्या सक्तीच्या बंदीनंतर 11 जून गुरुवारपासून लीग पुन्हा सुरू होत आहे. बार्सिलोनाच्या सलामीच्या सामन्यात लिओनेल मेस्सी खेळणार नसला तरी स्पर्धेची उत्कंठा कमालीची वाढलेली आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षक नसले किंवा होम टीमला सपोर्ट करताना या प्रेक्षकांनी केलेला जल्लोषाला खेळाडू मुकणार असले तरी टीव्ही किंवा मोबाईवरून थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या फुटबॉलप्रेमींच्या आनंदात काहीही बदल होऊ नये, यासाठी ब्रॉडकास्टर्स ग्राफिक्‍स आणि आवाजांची फोडणी देणार आहेत. 

वाचा ः भीषण ! 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...

सामन्यांचे थेट प्रक्षेपण पहात असताना स्टेडियममध्ये प्रेक्षक होम टीमची जर्सी घालून बसल्याचे दिसून येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा आभास निर्माण करण्यात येणार आहे, नॉर्वेची विझार्ट कंपनी ही सर्व किमया करणार आहे. 

वाचा ः राज्यातील न्यायालये सुरु तर झाली; पण भेडसावणाऱ्या आव्हानांचं काय..?

अशी असेल तंत्रज्ञानाची किमया 
जेव्हा सामना थांबलेला असेल तेव्हा होम टीमचे प्रेक्षक दिसायला लागतील त्याला फिफाच्या ईए स्पोर्टसकडील प्रेक्षकांचे आवाजाची जोड असेल. ला लीगाचे प्रायोजक ईए यांनी आतापर्यंत झालेल्या थेट सामन्यांचे जे चित्रीकरण केले आहे त्यातून आवाजाच्या ध्वनिफीत वापरण्यात येणार आहेत. ला लीगामध्ये बार्सिलोना आणि रेयार माद्रिद यांच्याच कमालीची चुरस आहे. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे ब्रेक लागला तेव्हा बार्सिलोना माद्रिदपेक्षा दोन गुणांनीच आघाडीवर होते.