Anant Ambani and Radhika Merchant Wedding: आकाश अंबानीने 'थाला'ला शिकवला दांडिया; देसी अवतारात दिसला DJ Bravo.. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला दिसले क्रिकेटर्स

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महेंद्रसिंग धोनी कुटुंबासह जामनगरला पोहोचला आहे.
Anant Ambani and Radhika Merchant Wedding
Anant Ambani and Radhika Merchant WeddingEsakal

अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महेंद्रसिंग धोनी कुटुंबासह जामनगरला पोहोचला आहे. त्यावेळी तिथे आकाश अंबानी यांनी महेंद्रसिंग धोनीला दांडिया खेळायला शिकवला, यावेळचा त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलात व्हायरल झाला आहे.

आजकाल गुजरातमधील जामनगरमध्ये अनेक सेलिब्रिटी दाखल झाले आहेत. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये अनेक स्टार क्रिकेटर्सही हजेरी लावत आहेत. पाहुण्यांच्या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचाही समावेश आहे. या कार्यक्रमातील धोनीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात तो आकाश अंबानीकडून दांडिया शिकताना दिसत आहे.

Anant Ambani and Radhika Merchant Wedding
Ind vs Eng : शेवटच्या कसोटीत सामन्यात रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय, प्लेइंग-11 मधून 'या' 2 खेळाडूंचा पत्ता कट?

अनंत अंबानी आणि त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीचे तीन दिवसीय सोहळे जामनगर शहराजवळील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) जवळील निवासी टाउनशिपमध्ये आयोजित केले जात आहेत. रविवारी तेथे देसी डे चे आयोजन करण्यात आले होते, तेथे दांडियाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. झारखंडचा रहिवासी असलेल्या धोनीला दांडिया कसा खेळायचा हे माहीत नव्हते. अशा परिस्थितीत मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याने त्यांना दांडिया खेळायला शिकवले. यावेळी धोनीही एन्जॉय करताना दिसला.

Anant Ambani and Radhika Merchant Wedding
Lok Sabha elections 2024 : कोण आहे पॅरा अ‍ॅथलिट देवेंद्र झाझरिया? ज्याला भाजपनी दिली खासदारकीची उमेदवारी

आकाश अंबानी तिथून गेल्यानंतर ब्राव्होने धोनीसोबत दांडिया खेळला. धोनीचा गुजराती लूक चाहत्यांना खूप आवडला. धोनीसोबत चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होही दिसला. पिवळ्या कुर्त्यात ब्राव्हो एकदम देसी दिसत होता. या इव्हेंटमध्येही ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्जच्या रंगात दिसत असल्याचे काही लोकांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित

मेटा संस्थापक मार्क झुकेरबर्ग पत्नी प्रिसिला चॅन, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका, उद्योगपती गौतम अदानी, नंदन नीलेकणी आणि आदर पूनावाला, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहित शर्मा यांच्यासह अन्य सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते. याशिवाय अमिताभ बच्चन, रजनीकांत, आमिर खान, करण जोहर, रणबीर कपूर-आलिया भट्ट, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनीही सहभाग घेतला होता.

Anant Ambani and Radhika Merchant Wedding
Viral Video : युझवेंद्र चहल आला रडकुंडी; 25 वर्षीय महिला कुस्तीपटूने उचलले खांद्यावर अन्...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com