कमालीचा योगायोग; तिचा अन् ऋतूराजचा बर्थडे एकाच दिवशी

Rutruraj Gaikwad and Sayali Sanjeev
Rutruraj Gaikwad and Sayali SanjeevSakal
Updated on
Summary

सायलीनेही त्याला हार्टवाल्या इमोजीनं रिप्लाय दिला आणि दोघांच्यात प्रेमाचा खेळ रंगल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

भारतीय क्रिकेटमधील युवा आणि मराठमोळा चेहरा ऋतूराज गायकवाड आपल्या दमदार कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतूराजनं अल्पावधीच आपली वेगळी ओळख बनवलीये. चेन्नई सुपर किंग्जनं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन ऋतूराज गायकवाडला 25 व्या वाढदिवसाच्या (Rutruraj Gaikwad Birthday) खास शुभेच्छा दिल्यात. एक विशेष गोष्ट म्हणजे आणखी एका सेलिब्रिटीचाही आज वाढदिवस आहे. आणि ते नाव आहे अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev)

गेल्या वर्षभरातील कामगिरीमुळे स्टार बनलेल्या ऋतूराज गायकवाडवर (Rutruraj Gaikwad) अनेक तरुणी फिदा आहेत. यात चर्चेचा विषय ठरला होता तो म्हणजे सायली संजीवनं (Sayali Sanjeev) ऋतूराज गायकवाडला क्लीन बोल्ड केल्याचा. सायली संजीव ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. वेगवेगळ्या अंदाजातील खास फोटो ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. ऋतूराज गायकवाडने तिच्या एका फोटोवर व्वा...अशी कमेंट केली होती. सायलीनेही त्याला हार्टवाल्या इमोजीनं रिप्लाय दिला आणि दोघांच्यात प्रेमाचा खेळ रंगल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

Rutruraj Gaikwad and Sayali Sanjeev
फुटबॉलपटूनं गर्लफ्रेंडला ओठ तुटेपर्यंत मारलं; फोटो ऑडिओ क्लिप व्हायरल

31 जानेवारी 1997 मध्ये पुण्यात ऋतूराजचा जन्म झाला. त्याने (Ruturaj Gaikwad) ने मागील वर्षभरात देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्ये आपला दबदबा दाखवून दिला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील शतकी खेळीच्या जोरावर त्याने टीम इंडियात स्थान मिळवले. ऋतूराज गायकवाड आता महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू आहे. आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी चेन्नईने त्याला रिटेन करत त्याचा पुरावाही दिला आहे.

Rutruraj Gaikwad and Sayali Sanjeev
Australian Open: पराभवालाही 'पराभूत' करत नदालने इतिहास रचला

ऋतूराज गायकवाडसोबत जिची चर्चा रंगली होती त्या सायली संजीवचा जन्मही 31 जानेवारीचाच. हा एक कमालीचा योगायोगच म्हणावा लागेल. सायलीही ऋतूराजपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' ही तिची मालिका प्रचंड गाजली होती. मुळची धुळे खानदेशातील तारकेनं चित्रपटातही काम केले आहे. ऋतूराजला तिने क्लीन बोल्ड केल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर ऋतूराजने मात्र डिफेन्सिव शॉट खेळावा तशी प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. माझी विकेट फक्त गोलंदाज घेऊ शकतो, असा रिप्लाय देत ऋतूराजनं सायलीसोबत पार्टनरशिपच्या चर्चेला ब्रेक दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com