Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Martina Devi Maibam Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताची अवघ्या २० वर्षीय वेटलिफ्टर मार्टिना देवी मैबाम हिने जगातील अव्वल खेळाडूंना कडवी टक्कर देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिला ८६+ किलो गटाच्या अंतिम फेरीत तिने दमदार कामगिरी केली, मात्र पदकापासून थोडक्यात दूर राहावे लागले. अखेरीस तिने पाचव्या स्थानावर स्पर्धा संपवली.
Who is Martina Devi Maibam Indian weightlifter

Who is Martina Devi Maibam Indian weightlifter

Updated on

Who is Martina Devi Maibam Indian weightlifter? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताची अवघ्या २० वर्षीय वेटलिफ्टर मार्टिना देवी मैबाम हिने जगातील अव्वल खेळाडूंना कडवी टक्कर देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिला ८६+ किलो गटाच्या अंतिम फेरीत तिने दमदार कामगिरी केली, मात्र पदकापासून थोडक्यात दूर राहावे लागले. अखेरीस तिने पाचव्या स्थानावर स्पर्धा संपवली. पण, तिच्या प्रयत्नांचे साऱ्यांनी कौतुक केले. इंग्लंडच्या एमिली कॅम्बेलने २७८ किलोच्या गेम रेकॉर्ड व राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक कायम राखले. मलेशियाच्या फरहाना ( २५३ किलो) व कॅनडाच्या लव्ह ( २५०) यांनी रौप्य व कांस्यपदक जिंकले. भारताची मार्टिना २४५ किलोसह पाचवी राहिली, परंतु तिचा १४६ किलोचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर तिने कांस्यपदक जिंकले असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com