'गोल्डन पंच' देणारी बॉक्सर Nikhat Zareen आहे तरी कोण?| Who is Nikhat Zareen | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Who is Nikhat Zareen
'गोल्डन पंच' देणारी बॉक्सर Nikhat Zareen आहे तरी कोण?

'गोल्डन पंच' देणारी बॉक्सर Nikhat Zareen आहे तरी कोण?

भारताच्या महिला बॉक्सर निखात झरीनने (Nikhat Zareen) महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपध्ये इतिहास रचला. काल म्हणजेच गुरुवारी झालेल्या फायनल मध्ये 52 किलो वजनी गटात थायलंडची बॉक्सर जितपॉन्ग जुटामासचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरलं. जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. भारताला सुवर्णदिवस दाखवणारी निखात आहे तरी कोण?

निखत झरीनने ५२ किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे. आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. यात आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.

हेही वाचा: भारताची निखात झरीन ठरली नवी बॉक्सिंग चॅम्पियन!

कोण आहे निखत

निखातचा जन्म तेलंगानायेथील निजाबाद येथे 14 जून 1996 मध्ये झाला. या सुवर्णकन्येने अवघ्या वयाच्या 13 व्या वर्षी बाक्सिंग ग्ल्बसशी मैत्री केली. ती भारतीय बॉक्सिंग लीजेंड एमसी मेरी कोमला तिचा आदर्श मानते.

25 वर्षीय निखत झरीन ही जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला बॉक्सर आहे. तिच्या वडिलांचे नाव मुहम्मद जमील अहमद आणि आईचे नाव परवीन सुलताना आहे.

निखत झरीनने गेल्या काही दिवसांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. निखतने 2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकलं होतं. तर याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडा हिचा 5-0 असा पराभव केला होता.

हेही वाचा: LIVE मॅच सुरु असतानाच स्टार बॉक्सरला आला हार्ट अटॅक; मुसाचं रिंगमध्येच निधन

आत्तापर्यंतची तिची कामगिरी

निखातने 2010 मध्ये पहिले गोल्ड मेडल नॅशनल सब ज्यूनिअर मीट स्पर्धेत जिंकले होते. त्यानंतर तुर्की येथे 2011 मध्ये महिला ज्युनिअर आणि युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिमयनशिपमध्ये फ्लायवेटमध्ये निखतने पहिल्यांदा देशासाठी इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.

वयाच्या 15 व्या वर्षी 2011 मध्ये एआयबीए महिला युवा आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर दोन वर्षानंतर 2013 मध्ये सिल्वर मेडल जिंकले. 2014 मध्ये, निखतने सर्बिया येथे झालेल्या तिसर्‍या नेशन्स कप आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत 51 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. अनेक वर्षांनंतर थायलंड ओपन इंटरनॅशनलमधील रौप्यपदक भारताच्या झोतात आले. 2019 मध्ये, त्याने बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

Web Title: Who Is Nikhat Zareen Indian Gold Medal Winner At World Boxing World Boxing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Boxing
go to top