esakal | Wimbledon : नंबर वन अ‍ॅश्ली बार्ती नवी सम्राज्ञी!
sakal

बोलून बातमी शोधा

Ashleigh Barty and Karolina Pliskova

Wimbledon : नंबर वन अ‍ॅश्ली बार्ती नवी सम्राज्ञी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Wimbledon 2021 Womens Singles Final : महिला टेनिस जगतातीलल अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियन अ‍ॅश्ली बार्तीने विम्बल्डनच्या महिला एकेरीत नवा इतिहास रचला. कॅरोलिना प्लिस्कोवाविरुद्ध रंगलेल्या फायनलमध्ये तिने 6-3, 6-7 (4-7), 6-3 असा विजय नोंदवला. मागील 41 वर्षांत विम्बल्डनची फायनल गाठणारी बार्ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू आहे. यापूर्वी 1980 मध्ये इइवॉन गूलागॉन्ग विम्बल्डनची फायनल खेळताना दिसली होती. ही स्पर्धा जिंकत बार्तीने कारकिर्दीतील दुसऱ्या ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले. 2019 मध्ये अ‍ॅश्ली बार्तीने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. (Wimbledon 2021 Womens Singles Final Ashleigh Barty Beat Karolina Pliskova and Win 2nd Career Grand Slam)

दोन्ही महिला खेळाडू विम्बल्डनच्या पहिलीच फायनल खेळत होते. त्यामुळे विम्बल्डनला नवी सम्राज्ञी मिळणार हे अगोदरच स्पष्ट झाले होते. फायनलमध्ये अखेर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या बार्तीने बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये धमाकेदार खेळ करणाऱ्या बार्तीला चक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने दुसऱ्या फेरीत कोंडीत पकडले. दुसरा सेट टाय ब्रेकरमध्ये जिंकत तिने हा सामना तिसऱ्या सेटपर्यंत नेला. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा जोरदार कमबॅक करत बार्तीने सेटसह सामना आपल्या नावे केला.

हेही वाचा: जबऱ्या कॅचनंतर प्रियांका गांधीही झाल्या हरलीनच्या फॅन

2019 मधील फ्रेंच ओपननंतर दुसऱ्यांदा बार्ती एखाद्या ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये पोहचली होती. दुसऱ्यांदाही तिची चाल यशस्वी ठरली. यासाठी तिला चांगलाच संघर्ष करावा लागला. पहिल्या सेटमध्ये बार्तीने प्लिस्कोवाची सर्विस ब्रेक करुन 4-0 अशी आघाडी घेतली. प्लिस्कोवाने दोन वेळा बार्तीची सर्विस ब्रेक करत सामन्यात येण्याचा कसून प्रयत्न केला. पण हा सेट बार्तीने 6-3 असा आपल्या नावे केला.

दुसऱ्या सेटमध्ये खेळ बरोबरीचा झाला

महिला टेनिस जगतातील आठव्या मानांकित प्लिस्कोवाने दमदार खेळ केला. मोठ्या रॅलीच्या माध्यमातून तिने नंबर वन खेळाडूला दमवलं आणि ट्रायब्रेकरमध्ये तिने सेट 7-6 असा आपल्या नावे करुन खेळ अजून संपला नाही, याचे संकेत दिले.

हेही वाचा: मुंबईकराने वॉर्नरला दिला शॉक; रिअ‍ॅक्शन व्हायरल

41 वर्षांची ऑस्ट्रेलियाची प्रतिक्षा संपली

तिसऱ्या सेटमध्ये अ‍ॅश्ली बार्तीने प्रतिस्पर्धी कॅरोलिना प्लिस्कोवाची सर्विस ब्रेक करत आघाडी घेतली. या सेटमध्ये तिने कॅरोलिनाला अधिक संधी दिली नाही. हा सेट 6-3 असा जिंकत तिने सामना खिशात घातला. 41 वर्षानंतर ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. यापूर्वी 1980 मध्ये ऑस्ट्रेलियन इवॉन गूलागॉन्ग कॉली हिने जेतेपद मिळवले होते. या दिग्गज खेळाडूने दोनवेळा विम्बल्डन जिकंली होती. विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी बार्ती तिसरी ऑस्ट्रेलियन महिला ठरली. टेनिस जगतातील महान महिला खेळाडू मार्गारेट कोर्ट यांच्या नावे आहे. त्यांनी तीनवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकलीये.

loading image