esakal | लॉकडाऊनमुळे राज्य वूशू स्पर्धा भरली ऑनलाईन

बोलून बातमी शोधा

wushu

ज्य वूशू पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा ऑनलाईन घेताना खेळाच्या नियमावलीत माफक बदल केले आहेत. या ऑनलाईन स्पर्धेत पंच स्पर्धकांच्या कामगिरी व्हिडिओवरुन पाहून गुण देत आहेत.

लॉकडाऊनमुळे राज्य वूशू स्पर्धा भरली ऑनलाईन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या आक्रमणामुळे देशातील सर्व क्रीडा स्पर्धा जवळपास बंद असतानाच महाराष्ट्र वुशु संघटना राज्य स्पर्धा घेत आहे. राज्य वूशू पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा ऑनलाईन घेताना खेळाच्या नियमावलीत माफक बदल केले आहेत. या ऑनलाईन स्पर्धेत पंच स्पर्धकांच्या कामगिरी व्हिडिओवरुन पाहून गुण देत आहेत. एवढेच नव्हे तर या स्पर्धेतील कामगिरीनुसार राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे.

मोठी बातमी ः Big Breaking - 'लीलावती'मधील प्लाझ्मा थेरपी यशस्वी, राजेश टोपे यांची माहिती

कोरोनामुळे सर्वत्र निराशा आहे. या परिस्थितीत खेळाडू खेळापासून दूर जाऊ नयेत यासाठी ही स्पर्धा होत आहे. ऑनलाईन ट्रेनिंग देत असताना या स्पर्धेची संकल्पना सूचली आणि तिचे जोरदार स्वागतही झाले, असे राज्य संघटनेचे सचिव सोपान कटके यांनी सांगितले. राष्ट्रीय वूशू महासंघाने आता या प्रकारची स्पर्धा घेण्याची सूचना केली आहे. कर्नाटक, तेलंगणा तसेच तमिळनाडूने या स्पर्धेचे वेळापत्रकही तयार केले आहे, तर राष्ट्रीय संघटनेने मेच्या अखेरीस राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. 

मोठी बातमी ः ...हातात नाही पैसे, खिन्न मनाने आता 'त्याही' म्हणतायत "मॅडम काम पर आऊ क्या?"

राज्य स्पर्धेत खेळाडूंना त्यांच्या घरात अथवा टेरेसमध्ये किंवा वऱ्हांड्यातच आपले कौशल्य दाखवण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांना बाद करण्यात येईल असेही सांगितले आहे.  या राज्य वुशु - ताऊलू स्पर्धेत स्पर्धकांना शॉर्ट वेपन आणि बेअर हँड प्रकारातील कौशल्य दाखवण्यासच परवानगी आहे, याकडे कटके यांनी लक्ष वेधले. त्यांनी घरात स्पर्धा होत असताना काठीचा उपयोग करुन होणारे लाँग वेपन प्रकार अशक्यच आहेत, असेही ते म्हणाले. संदीप शेलार, निलेश वाळिंबे, भूषण मराठे आणि प्रतिक्षा शिंदे हे ऑनलाईनच्या माध्यमातून खेळाडूंची कामगिरी बघत आहेत. 

मोठी बातमी ः  ए आई... मुलांची आईला आकांताने हाक पण लॉकडाऊनने केली ताटातूट, वाचा

आम्ही खेळाडूंनी कौशल्य दाखवताना आपले सर्व शरीर दिसेल याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. घरातीलच व्यक्ती हे कौशल्य टिपणार आहे, हे लक्षात घेऊन आम्ही याची चाचणी घेतली आहे. अर्थात खेळाडूंनी याची पूर्वकल्पना पुरेशी दिली होती, त्यामुळे खेळाडूंनी हॉलमधील सोफा, डायनिंग टेबल हलवले आहे. आम्ही प्रत्येकास कोणत्या वेळेस आपल्याला कामगिरी दाखवायची आहे, याची पूर्वकल्पना दिली होती. पहिल्या दोन दिवसात तरी कोणत्याही तांत्रिक अडचणी आम्हाला आल्या नाहीत.  

फरक पारंपारीक आणि ऑनलाईन स्पर्धेतील
- पारंपारीक स्पर्धेच्यावेळी 1 मिनिट 20 सेकंद वेळ, तर यावेळी     30 सेकंदाचा वेळ
- तायचीचक्वान, तायचीजेनसाठीचा कालावधीही कमी
- लाँग वेपनचे कौशल्य दाखवण्यास मनाई
- शॉर्ट वेपन प्रकारातील चारप्रकारापैकी फक्त एक करण्यास परवानगी
- बेअर हँड प्रकारात पारंपारीक चारऐवजी दोनच प्रकार करण्याची मंजूरी
- राज्य स्पर्धात प्रामुख्याने साडेपाचशे स्पर्धक, पण यावेळी दीडशेच स्पर्धक
- आमचे स्पर्धा प्रकार कमी झाले आहेत, त्यामुळे स्पर्धकात घट अपेक्षित

कोरोनाबाबत सातत्याने ऐकल्यामुळे काहीशी निराशा आली होती. खेळाडूंनाही स्पर्धा नसल्याने सरावासाठी उत्साह वाटत नव्हता. त्यामुळे खेळाडूंना खेळात कायम ठेवण्यासाठी आम्ही केलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. विजेत्या खेळाडूंना पदके त्यांच्या घरी पाठवली जाणार आहेत. पहिल्या तिघांना पदके देण्यात येतील, तर पहिल्या आठ खेळाडूंना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. 
- सोपान कटके, राज्य वुशू संघटनेचे सचिव