सर्वाधिक बोली लागलेले टॉप 10 महिला खेळाडू कोण? जाणून घ्या सविस्तर : Womens IPL Auction 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Sports

Womens IPL Auction 2023: सर्वाधिक बोली लागलेले टॉप 10 महिला खेळाडू कोण? जाणून घ्या सविस्तर

Womens IPL Auction 2023: इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL) मोठ्या यशानंतर आता महिलांसाठी देखील आयपीएल लवकरच सुरु होत आहे. यासाठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये विविध टीम्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक लिलावाची बोली मिळालेली महिला खेळाडू ही टीम इंडियाची असून इतरही अनेकांना चांगली बोली लागली आहे.

महिला आयपीएलच्या आजच्या लिलावात टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधाना हीला सर्वाधिक बोली लागली आहे. ३.४० कोटी रुपयांची तिला सर्वाधिक बोली लागली आहे. यामध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या टॉप 10 खेळाडूंमध्ये भारताच्या ७ महिलांचा समावेश आहे. तर केवळ तीन महिला खेळाडू या इतर देशांच्या आहेत.

सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंची यादी

  1. 3.4 कोटी - स्मृती मानधना (भारत) - RCB

  2. 3.2 कोटी - अॅशले गार्डनर (ऑस्ट्रिलिया ) - GG

  3. 3.2 कोटी - नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड) - MI

  4. 2.6 कोटी - दीप्ती शर्मा (भारत) - UPW

  5. 2.2 कोटी - जेमिमाह रॉड्रिग्ज (भारत) - DC

  6. 2.0 कोटी - शेफाली वर्मा (भारत) - DC

  7. 2.0 कोटी - बेथ मुनी (ऑस्ट्रिलिया) - GG

  8. 1.9 कोटी - पूजा वस्त्राकर (भारत) - MI

  9. 1.9 कोटी - ऋचा घोष (भारत) - RCB

  10. 1.8 कोटी - हरमनप्रीत कौर (भारत) - UPW

किती खेळाडूंचा स्लॉट आहे?

यंदाच्या महिला प्रीमियर लीगसाठी एकूण 90 खेळाडूंचा स्लॉट आहे. यात एक संघ किमान 15 तर कमाल 18 खेळाडू घेऊ शकतात. यामध्ये विदेशी खेळाडूंसाठी प्रत्येक संघात जास्तीजास्त 6 विदेशी खेळाडू निवडण्याची मुभा आहे. पहिल्या हंगामासाठी एकूण विदेशी खेळाडूंची संख्या ही जास्ताजास्त 30 असेल तर भारतीय खेळाडूंची संख्या 60 असेल.

कोणत्या देशाचे किती खेळाडू?

ऑस्ट्रेलिया - 28, इंग्लंड 27, वेस्ट इंडीज 23, न्यूझीलंड 19, दक्षिण आफ्रिका 17, श्रीलंका 15, झिम्बाब्वे 11, बांगलादेश 9, आयर्लंड 6, युएई 4, अमेरिका, हाँग-काँग, नेदलँड्स आणि थायलंड प्रत्येकी 1, असोसिएट नेशन 8 खेळाडू.

टॅग्स :sportsIPL