World Chess : जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ भारतात? ; गुकेश-लिरेन सामना, भारतीय संघटना यजमानपदासाठी प्रयत्नशील

जागतिक बुद्धिबळ विश्वात इतिहास घडवणारा भारताचा डी. गुकेश आणि विद्यमान विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यात होणारी यंदाची जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा भारतात खेळवण्यासाठी भारतीय बुद्धिबळ संघटना सर्व शक्यता पडताळत आहेत.
World Chess
World Chess sakal

चेन्नई : जागतिक बुद्धिबळ विश्वात इतिहास घडवणारा भारताचा डी. गुकेश आणि विद्यमान विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यात होणारी यंदाची जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा भारतात खेळवण्यासाठी भारतीय बुद्धिबळ संघटना सर्व शक्यता पडताळत आहेत.

भारतीय बुद्धिबळ क्षितिजावरचा नवा तारा असलेल्या गुकेशसाठी आम्ही मोठी बक्षीस रक्कम देणार आहोत, अशी घोषणा भारतीय बुद्धिबळ संघटनेटचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी केली. कॅनडात सोमवारी पार पडलेल्या आव्हानवीरांच्या स्पर्धेत १७ वर्षीय गुकेशने विजेतेपद मिळवून बुद्धिबळ विश्वाला थक्क केले.

आम्ही सर्व परिस्थिती आणि शक्यतांचा अभ्यास करत आहोत, येत्या काही दिवसांत त्याबाबत स्पष्टता येईल. संधी मिळाली तर आम्ही निश्चितच जागतिक अजिंक्यपदाची लढत भारतात खेळण्यासाठी प्रयत्न करू, मात्र त्यासाठी प्रायोजक आणि सरकार यांचे सहकार्य महत्त्वाचे असेल, असे नारंग यांनी सांगितले. बुद्धिबळ क्षेत्रातील ही सर्वात प्रतिष्ठेची लढत आयोजित करण्यासाठी भारताने यजमानपदाच्या शर्यतीत उडी मारली तर अनेक प्रायोजक तयार आहेत, असे वृत्त आहे; परंतु त्या संदर्भात अधिक बोलण्यास नारंग यांनी नकार दिला.

World Chess
D Gukesh Chess : टोरांटोमध्ये भारतीय वादळ ; गॅरी कॅस्पारोव

डिंग लिरेन विद्यमान विश्वविजेता असला तरी यंदाच्या मुकाबल्यात गुकेश त्याला भारी पडू शकतो. लिरेन सध्या खेळत नसल्यामुळे त्याला फॉर्म मिळवायला वेळ लागू शकेल. या तुलनेत गुकेशचा चांगला सराव होत आहे, असे मत माजी महिली विश्वविजेती ग्रँडमास्टर सुसान पोल्गरने मांडले आहे.

भारताने या अगोदर विश्व बुद्धिबळ स्पर्धा, बुद्धिबळ ऑलिंपियाड तसेच विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील विश्व अजिंक्यपद सामन्याचे यजमानपद भूषवलेले आहे. आनंद आणि कार्लसन यांच्यातील सामना चेन्नईत झाला होता. आनंदला हरवून कार्लसन विजेता ठरला होता. २०२२ मध्ये चेन्नईतच झलेल्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये १८६ देशांचे १,७३७ बुद्धिबळटू सहभागी झाले होते. गुकेशने त्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे त्या स्पर्धेला ‘गुकेश ऑलिंपियाड’ म्हणूनही संबोधले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com