WTC Final Mitchell Marsh
WTC Final Mitchell Marsh esakal

WTC Final : भारताचं टेन्शन वाढलं! तब्बल 4 वर्षानंतर 'या' अष्टपैलू क्रिकेटपटूनं केलं कसोटी संघात पुनरागमन

WTC Final Mitchell Marsh : भारतीय संघातील धुरंधर इकडे आयपीएल खेलण्यात मग्न असताना तिकडे ऑस्ट्रेलियाने WTC Final ची तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध जून महिन्यात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आपल्या कसोटी संघाची घोषणा देखील केली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या या संघात एक धाकड अष्टपैलू खेळाडू दाखल झाला आहे.

WTC Final Mitchell Marsh
Harbhajan Singh Sanju Samson : हरभजनने RR च्या 'या' खेळाडूची केली थेट धोनीशी तुलना; म्हणाला आता टीम इंडियात...

मिचेल मार्शने जवळपास 4 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. मार्श हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजी आणि उपयुक्त वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या WTC Final सामन्यात तो एक ट्रम्प कार्ड ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाने 17 सदस्यीय संघ जाहीर केला. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा देखील समावेश आहे. यात डेव्हिड वॉर्नरला देखील संधी मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात सलामीवीर म्हणून डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांचा समावेश आहे. तसेच बॅकअप प्लॅन म्हणून मार्कस हॅरिसचा देखील समावेश या संघात केला आहे. या संघात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि स्कॉट बॉलँड हे चार वेगवान गोलंदाज आहेत. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून कॅमरून ग्रीन आणि मिशेल मार्श यांचा समावेश करण्यात आला आहे. नॅथन लियॉन आणि टॉड मर्फी ही फिरकी जोडी देखील संघात आहे.

WTC Final Mitchell Marsh
1000th IPL game : मुंबई - राजस्थान सामना होणार ऐतिहासिक; BCCI ने देखील कसली कंबर

WTC च्या अंतिम सामन्यासाठी निवडलेला ऑस्ट्रेलियाचाच संघ अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये देखील खेळेल. भारतासोबत होणारी WTC Final ही 7 जून पासून 11 जून पर्यंत होणार आहे. हा सामना द ओवलवर खेळवला जाईल. यानंतर 16 जूनपासून अॅशेस मालिका सुरू होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना 16 जून ते 20 जून एजबेस्टन येथे खेळवला जाईल. तर दुसरा कसोटी सामना 28 जून ते 2 जुलै दरम्यान लॉर्ड्सवर खेळवला जाईल.

WTC Final साठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ :

पॅट कमिन्स, स्कॉट बॉलँड, एलेक्स केरी, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जॉश हेडलवूड, ट्रॅव्हिस हेड, जॉश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशग्ने, नॅथन लियोन, मिशेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com