WTC Final साठी ऑस्ट्रेलियाकडून संघ जाहिर, डेव्हिड वॉर्नरसंदर्भात मोठी अपडेट

2021 साली न्यूझीलंडविरुद्ध फायनल गमावल्यावर यंदा पुन्हा एकदा भारताला हा चषक जिंकण्याची संधी
WTC Final
WTC Final

कसोटी क्रिकेटचा विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC). या मानाच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा भारतानं एन्ट्री मिळवली आहे. यंदा भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. 2021 साली न्यूझीलंडविरुद्ध फायनल गमावल्यावर यंदा पुन्हा एकदा भारताला हा चषक जिंकण्याची संधी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. (David Warner retains spot as Australia name WTC final Ashes squad )

ऑस्ट्रेलियाने WTC फायनलसाठी 17 खेळाडूंचा संघ निवडला आहे, त्याचे नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा निवडलेला संघ मजबूत दिसत आहे. अष्टपैलू मिचेल मार्श पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीकडे अनुभवी खेळाडू आहेत.

WTC Final
SRH vs MI : अर्जुनने उघडले विकेटचे खाते; मुंबईच्या गोलंदाजांचा प्रभावी मारा, साधली विजयाची हॅट्ट्रिक

ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी आणि अॅशेस या दोन्हीसाठी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड यांच्या वेगवान चौकडीवर अवलंबून आहे. वेगवान चौकडीला नॅथन लियॉन आणि फिरकीपटू टॉड मर्फी यांचा भक्कम पाठिंबा मिळेल.

डब्ल्यूटीसी फायनल आणि अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघ निवडीतील सर्वात मोठा प्रश्न डेव्हिड वॉर्नरबद्दल होता. वॉर्नरच्या आउट ऑफ फॉर्ममुळे त्याच्या निवडीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, व्यवस्थापनाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. याशिवाय मॅट रेनशॉ आणि मार्कस हॅरिस यांनीही आपली जागा निश्चित केली आहे.

WTC फायनल आणि ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (विकेटकिपर), अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, स्कॉट बोलँड, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ. , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

WTC Final
SRH vs MI IPL 2023 : मुंबईचा सलग तिसरा विजय, हैदराबादचा केला 14 धावांनी पराभव

भारताची WTC फायनलमध्ये एन्ट्री

अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना भारतीय संघ खेळला. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, असता तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली असती.

त्यानुसार सामना अनिर्णीत राहिला पण श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सामन्यात श्रीलंकेने आधी 355 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 373 धावा केल्या.

मग श्रीलंकेचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपल्यावर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी 8 गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत सामना जिंकला. ज्यामुळे भारताची गुणतालिकेतील स्थिती मजबूत झाली असून भारत थेट WTC Final साठी पात्र ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com