World Test Championship : पाकचा पराभव पडला भारताच्या पथ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Test Championship Point Table Pakistan Left Behind India After Lost 2nd Test Against Sri Lanka

World Test Championship : पाकचा पराभव पडला भारताच्या पथ्यावर

गाले : पाकिस्तान आणि श्रीलंका (Sri Lanka Vs Pakistan) यांच्यातील दुसरा कसोटी सामना श्रीलंकेने 246 धावांनी जिंकला. श्रीलंकेच्या या विजयाबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021 - 23 च्या पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका झाली. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला. तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकत मालिका बरोबरीत सोडवली.

हेही वाचा: Chess Olympiad : आश्चर्य! संघ भारतात पोहचूनही पाकिस्तानची माघार

पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (World Test Championship Point Table) तिसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. बाबर सेनेने दुसरी कसोटी देखील जिंकली असती तर ते पहिल्या दोन संघात सामिल होण्याच्या जवळ पोहचले असते. मात्र करूणारत्नेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या श्रीलंकेने दुसरी कसोटी जिंकत पाकिस्तानचा हा मनसुबा उधळून लावला. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्या आणि रमेश मेंडीस यांनी या विजयाचा पाया रचला.

पाकिस्तानचा दुसऱ्या कसोटीत 246 धावांनी दारूण पराभव झाल्यामुळे पाकिस्तान आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. भारत या यादीत चौथ्या स्थानावर आहे. भारताला इंग्लंडमध्ये बर्मिंगहम कसोटीत पराभव सहन करावा लागला होता. दुसरीकडे श्रीलंकेने पाकिस्तानवर विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया विरूद्धची कसोटी मालिका देखील बरोबरीत सोडवली होती.

हेही वाचा: Sebastian Vettel : चार वेळा F1 जिंकणाऱ्या सबॅस्टियन व्हेट्टलेने घेतली निवृत्ती

भारत आणि पाकिस्तान यांच्या गुणांमध्ये फारसा फरक नाही. भारताची PCT (जिंकण्याची टक्केवारी) 52.08 टक्के आहे तर पाकिस्तानची PCT 51.85 इतकी आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका 71.43 PCT पॉईंट घेऊन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलिया 70 PCT मिळवत दुसऱ्या स्थनावर आहे.

हेही वाचा: SL vs PAK : जयसूर्याचा पंच; बाबर सेना 261 धावात ढेर

WTC गुणतालिका (WTC POINTS TABLE)

1. दक्षिण आफ्रिका - 71.43 PCT

2. ऑस्ट्रेलिया - 70 PCT

3. श्रीलंका - 53.33 PCT

4. भारत - 52.08 PCT

5. पाकिस्तान - 51.85 PCT

6. वेस्ट इंडीज - 50 PCT

7. इंग्लंड - 33.33 PCT

Web Title: World Test Championship Point Table Pakistan Left Behind India After Lost 2nd Test Against Sri Lanka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..