श्रीलंकेने ICC World Test Championship मध्ये भारताला दिला मोठा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC World Test Championship

श्रीलंकेने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला दिला मोठा धक्का

ICC World Test Championship: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डावाने पराभव केला. यासह 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. ही मालिका वर्ल्ड चॅम्पियनशिपचा भाग होती. अशा स्थितीत या विजयामुळे श्रीलंकेला 12 गुण मिळाले.

हेही वाचा: Sl vs Aus Test: श्रीलंकेच्या विजयात चंडिमल, जयसूर्या चमकले

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये श्रीलंका सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया नंबर-1 वरून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. श्रीलंकेच्या विजयामुळे टीम इंडिया आणखी एक पायरी खाली आहे. आता इंडिया पाचव्या स्थानावर आली आहे. दुसऱ्या कसोटीत दिनेश चंडीमलने शानदार द्विशतक झळकावले, आणि पदार्पण करताच डावखुरा फिरकी गोलंदाज जयसूर्याने 12 विकेट घेतले.

दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाची 78 गुण होते. मात्र पराभवानंतर त्याचे 70 गुण झाले आहेत. चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच सामना गमवावा आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 6 सामने जिंकले आहेत तर 3 सामने अनिर्णित ठेवले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावरून नंबर-1 वर आला. त्याने आतापर्यंत 7 सामने खेळले त्यात 5 मध्ये जिंकले तर 2 मध्ये पराभूत झाला आहे.

हेही वाचा: विराटची 'जोकर'वाली स्माईल; वेदना सांगणारा VIDEO व्हायरल

श्रीलंकेचा संघ 54.17 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तानचे 7 सामन्यांनंतर 52.38 गुण झाले असून ते चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. 6 मध्ये जिंकले, तर 2 मध्ये हरले. संघ 52.08 गुणांसह 5व्या क्रमांकावर आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत त्याचा पराभव झाला. टेबलमधील इतर संघांबद्दल बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिज 50 टक्के गुणांसह सहाव्या, इंग्लंड 33.33 टक्के गुणांसह 7 व्या आणि न्यूझीलंड 25.93 टक्के गुणांसह 8 व्या क्रमांकावर आहे. बांगलादेश संघ तळाला आहे. त्याला 13.33 टक्के गुण आहेत.

Web Title: World Test Championship Sri Lankas Team Reached Number 3 With Victory Team India Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..