WPL Auction 2023: अर्जुन तेंडुलकरच्या मैत्रिणीवर बसला अनसोल्डचा शिक्का! MI धावणार मदतीला?

WPL Auction 2023
WPL Auction 2023sakal

WPL Auction 2023 : महिला प्रीमियर लीग 2023च्या लिलावात फ्रँचायझींनी अनेक मोठ्या महिला क्रिकेटपटूंवर जोरदार बोली लावली. त्याचबरोबर काही खेळाडू असे होते जे लिलावात न विकले गेले. त्यापैकी एक नाव म्हणजे इंग्लंडचा स्टायलिश खेळाडू डॅनी व्याट.

महिला प्रीमियर लीगमध्ये डॅनी व्याटने 50 लाखांच्या मूळ किंमत होती. मात्र त्याच्यावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. डॅनीने इंग्लंडकडून 102 एकदिवसीय आणि 139 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. विशेषत: टी-20 फॉरमॅटमध्ये ती धोकादायक खेळाडू आहे.

WPL Auction 2023
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाची रडारडी सुरूच! आधी खेळपट्टी आता स्टेडियमला नाक मुरडलं

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा डॅनी व्याटचा खास मित्र आहे. खरे तर सचिन दर उन्हाळ्यात आपल्या कुटुंबासह इंग्लंडला सुट्टी घालवण्यासाठी जातो. डॅनी आणि अर्जुन अनेकदा इंग्लंडमध्ये एकत्र दिसले आहेत. यादरम्यान डॅनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये ती अर्जुनसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेली आहे. अर्जुन आणि डॅनीचा फोटो त्यावेळी चर्चेत होता.

केवळ अर्जुन तेंडुलकरच नाही तर विराट कोहलीमुळे इंग्लंडची स्टार महिला क्रिकेट डॅनी व्याटही चर्चेत होती. ही घटना 2014 सालची आहे जेव्हा त्याने ट्विटरवर कोहलीवरील प्रेम व्यक्त केले आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी विराट कोहली अनुष्का शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

WPL Auction 2023
Womens IPL Auction 2023: सर्वाधिक बोली लागलेले टॉप 10 महिला खेळाडू कोण? जाणून घ्या सविस्तर

डॅनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या राष्ट्रीय संघासाठी 1176 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने टी-20 मध्ये 124.51 च्या स्ट्राईक रेटने 2260 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 2 शतके आणि 10 अर्धशतके आहेत. केवळ फलंदाजीतच नाही तर त्याने वनडेमध्ये 27 आणि टी-20मध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. असे असूनही महिला प्रीमियर लीगसाठी कोणत्याही संघाने तिला बोली लावली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com