Sakshi Malik Wrestlers Protest : जंतर - मंतरवर पुन्हा घुमणार कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा शड्डू? साक्षी- बजरंगने दिला इशारा

Sakshi Malik On Wrestlers Protest
Sakshi Malik On Wrestlers Protest esakal

Sakshi Malik On Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी करणारे भारताचे पदक विजेते कुस्तीपटू आंदोलन स्थगित करत नोकरीवर रूजू झाले. यानंतर आता कुस्तीपटूंचे आंदोलन संपुष्टात आले असा समज निर्माण झाला होता. मात्र साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आज जे काही वक्तव्य केले त्यावरून अजून आंदोलन संपले नसल्याचे अधोरेखित झाले.

Sakshi Malik On Wrestlers Protest
Rohit Sharma WTC Final : रोहितने ओव्हलवर केलं मोठं रेकॉर्ड; तेंडुलकर अन् सेहवागच्या क्लबमध्ये दाखल

कुस्तीपटूंच्या समर्थानात हरियाणाच्या सोनीपथ येथे आज जूनला महापंतायत झाली. महापंचायतीनंतर साक्षी मलिकने जर आमचे प्रश्न सुटले तरच आम्ही आशायई गेम्समध्ये सहभाग घेऊ असे सांगितले. येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनच्या हांग्जो येथे 2022 चे आशायाई गेम्स होणार आहेत.

दुसरीकडे बजरंग पुनियाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलन करणारे कुस्तीपटू हे विकले गेलेल नाहीत असे स्पष्ट केले. बजरंग पुनियाने पुन्हा जंतर मंतरवर जाण्याची घोषण देखील केली. पुनिया म्हणाला की आम्ही केंद्र सरकारला 15 जूनपर्यंत वेळ दिला आहे. जर तोपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही तर बृजभूषण यांच्या अटकेसाठी आम्ही पुन्हा आंदोलन करू.

Ind vs Aus WTC Final Day 4 LIVE : सेट झालेल्या रोहित - पुजारा खराब फटका मारून झाले बाद

बजरंग महापंचायतीमध्ये म्हणाला की, 'जानेवारीत आंदोलनापूर्वी बृजभषूण तेथे आले होते. जर स्वतःला विकायचं असतं किंवा तडजोड करायची असती तर तेव्हाच केली असती. आम्ही राजकारण करत नाही. हा आमच्या बहिणी आणि मुलींच्या सन्मानासाठी लढाई आहे. 15 जूनपर्यंत जर काही झालं नाही तर आम्ही पुन्हा जंतर मंतरवर आंदोलनासाठी बसणार आहोत.' माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी तयार नाहीये.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com