Sunil Gavaskar WTC Final : रोहितने संघातील 'या' खेळाडूचा सल्ला घ्यावाच... गावसकरांनी कोणाची केली इतकी स्तुती?

Sunil Gavaskar WTC Final Cheteshwar Pujara
Sunil Gavaskar WTC Final Cheteshwar Pujaraesakal

Sunil Gavaskar WTC Final Cheteshwar Pujara : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल ही 7 जून पासून ओव्हलवर होत आहे. सामना जसजसा जवळ येत आहे तसतसे दोन्ही संघ रणनिती आखण्यास सुरूवात करत आहेत. भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून त्यांनी सरावाला देखील सुरूवात केली आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी भारतीय संघाच्या दृष्टीने कोणता खेळाडू हा अत्यंत महत्वाचा आहे हे सांगितले.

Sunil Gavaskar WTC Final Cheteshwar Pujara
IPL 2023: आयपीएल संपली अन् हा खेळाडू झाला तंदुरुस्त! फ्रँचायझीला लावला 16.25 करोडोंचा चुना

सुनिल गावसकर यांच्या मतानुसार भारतीय संघासाठी चेतेश्वर पुजारा हा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. गावसकर म्हणाले की, 'तो इंग्लंडमध्ये बऱ्याच काळापासून आहे. याचा अर्थ त्याने ओव्हलची खेळपट्टी कशी खेळते याच्यावर त्याचे लक्ष असणार. तो कदाचित ओव्हलवर खेळला नसेल. तो जरी लंडनपासून दूर ससेक्समध्ये राहिला असेल मात्र ओव्हलवर काय सुरू आहे याच्यावर त्याची नजर असणारच.'

'फलंदाजी आणि कॅप्टन्सीचा विषय येईल त्यावेळी पुजाराचा सल्ला खूप महत्वाचा असेल. हे विसरून चालणार नाही की पुजाराने ससेक्सचे नेतृत्व देखील केले आहे. त्याने त्याचा ससेक्समधील सहकारी स्टीव्ह स्मिथला पाहून काही रणनिती देखील तयार केली असेल.'

Sunil Gavaskar WTC Final Cheteshwar Pujara
Ind vs Aus WTC Final 2023 Streaming : लंडनमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया, जाणून घ्या केव्हा, कुठे अन् कसा पाहणार सामना

आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना होऊ शकते अडचण

सुनिल गावसकर आयपीएल खेळून WTC फायनलचा सामना करणाऱ्या खेळाडूंना अडचणी येऊ शकतात असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'जवळपास सर्व भारतीय खेळाडू आयपीएल खेळून आले आहेत. त्यामुळे या खेळाडूंना बॅट फिरवण्याच्या वेगावर लक्ष द्यावे लागणार आहे. टी 20 मध्ये ते खूप वेगाने बॅट फिरवत होते.

'29 मे रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएल फायनल सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू खेळले होते. त्यांच्यासाठी टी 20 मधून थेट कसोटी क्रिकेटमध्ये येणे सोपे असणार नाही.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com