WTC Final Race : भारताच्या पराभवावर द. आफ्रिका - श्रीलंका आहे टपून; WTC फायनल गाठण्यासाठी... | India Vs Australia Test Series | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final Race India Vs Australia Test Series

WTC Final : भारताच्या पराभवावर द. आफ्रिका - श्रीलंका आहे टपून; WTC फायनल गाठण्यासाठी...

WTC Final Race : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या WTC पॉईंट टेबलमध्ये भारत 58.93 टक्के विनिंग पर्सेंटेज पॉईंट घेत दुसऱ्या तर 75.56 पर्सेंटेड पॉईंट घेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. मात्र असे असले तरी भारत - ऑस्ट्रेलिया बरोबरच दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज सुद्धा WTC फायलनमध्ये पोहचण्याती शक्यता आहे.

कोणत्या कसोटी मालिका आहेत शिल्लक?

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 4 कसोटी सामन्यांची मालिका (9 फेब्रुवारी ते 13 मार्च)

दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडीज - 2 कसोटी सामन्यांची मालिका (28 फेब्रुवारी ते 12 मार्च)

न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका - 2 कसोटी सामन्यांची मालिका (9 मार्च ते 21 मार्च)

कोण कोण आहे रेसमध्ये ?

ऑस्ट्रेलिया

भारत

दक्षिण आफ्रिका

श्रीलंका

वेस्ट इंडीज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्याची मालिकाच WTC फायलन कोणत्या दोन संघात खेळली जाईल हे ठरवणार आहे. मालिकेतील विजेता WTC फायनलमधील आपले स्थान पक्के करणार आहे.

कोणत्या परिस्थितीत भारत WTC फायल गाठू शकतो?

- भारताला कोणत्याही परिस्थिती मालिका जिंकावी लागणार आहे.

- मालिका बरोबरीत राहिली तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळेल.

- ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताने मालिका 1 - 0 ने जिंकली तरी भारताला फायनल गाठण्यासाठी पुरेसे आहे.

- भारताने जर ऑस्ट्रेलियाकडून 1 - 3 अशी मालिका हरली तरी भारताला संधी आहे. मात्र वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेला तर न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत करायला हवे.

ऑस्ट्रेलियाचा काय सीन आहे?

- ऑस्ट्रेलिया सध्या 75.56 विनिंग पर्सेंटेज घेऊन चांगल्या स्थितीत आहे.

- ऑस्ट्रेलियाला आपले WTC फायलनमधील स्थान अबाधित राखायचं असेल तर भारताविरूद्ध क्लीन स्वीप टाळावा लागणार आहे.

- मालिकेतील एक विजय त्यांचे WTC Final मधील स्थान पक्के करून जाईल.

- ऑस्ट्रेलियाला भारताकडून क्लीन स्वीप मिळाला तरी ते फायनलसाठी पात्र होऊ शकतात. मात्र त्यासाठी वेस्ट इंडीजने आफ्रिकेला 2 - 0 असे पराभूत करायला हवे तसेच न्यूझीलंडने श्रीलंकेचा 2 - 0 असा पराभूत करायला हवा.

- जर श्रीलंकेने न्यूझीलंडला 2 - 0 अशी मात दिली आणि ऑस्ट्रेलिया भारताकडून 4 - 0 असा हरला तर ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेला कशी आहे संधी?

- आफ्रिकेने जरी वेस्ट इंडीजचा 2 - 0 असा पराभव केला तरी त्यांचे WTC Finals मध्ये त्यांचे स्थान पक्के होणार नाही.

- आफ्रिकेला भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ड्रॉ होण्यासाठी देव पाण्यात ठेवावे लागतील.

- याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करावा यासाठी देखील प्रार्थना करावी लागले.

वेस्ट इंडीजही आहे रेसमध्ये

- वेस्ट इंडीजसाठी ही प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे.

- वेस्ट इंडीजचा सीन क्रिएट व्हायला ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 - 0 असा पराभव करावा लागले.

- वेस्ट इंडीजला दक्षिण आफ्रिकेला 2 - 0 असे हरवावे लागले.

- याचबरोबर त्यांना न्यूझीलंडने श्रीलंकेला 2 - 0 किंवा 1 - 0 असा पराभव करावा लागले.

श्रीलंकाही कानामागून येत तिखट होऊ शकतो

- श्रीलंकेचा फंडा सरळ असं नाही. त्यांना न्यूझींलडचा पराभव करावा लागले.

- जर ऑस्ट्रेलिया किंवा भारताने एकमेकाना क्वीन स्वीप दिली तर श्रीलंकेचा सीन क्रिएट होतो.

- दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिका ड्रॉ व्हायला हवी किंवा वेस्ट इंडीजने मालिका जिंकायला हवी.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली