esakal | WTC Final: ... अन् विराटच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

WTC Final: ... अन् विराटच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

sakal_logo
By
सुशांत जाधव

World Test Championship Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसाठी इंग्लंडमध्ये पोहचलेल्या टीम इंडियाने सरावाला सुरुवात केलीये. मोठ्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. साउथहॅम्प्टनच्या मैदानात रंगणाऱ्या फायनलपूर्वी टीम इंडियाने क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केलाय. छोट्या छोट्या ग्रुपमध्ये टीम इंडियाने प्रॅक्टिसलाही सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या मैदानात आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची टीम इंडियाला संधी आहे.

विराट कोहलीने शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ‘सूरज मुस्कान लाता है.’ या कॅप्शनसह त्याने साउथम्प्टनमधील वातावरणाची कहाणी फोटोच्या माध्यमातून शेअर केलीये. काही दिवसांपासून साउथहॅम्प्टनमध्ये पाऊस होत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चेहऱ्यावर हास्य फुलते, अशा आशयाचे कॅप्शन किंग कोहलीने शेअर केलेल्या फोटोला दिले आहे. आयसीसीच्या पहिल्या वहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारत आणि न्यूझीलंड पहिल्यांदाच त्रयस्थ ठिकाणी एकमेकांच्या विरोधात कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.

हेही वाचा: ENGvsNZ : टीम इंडिया विरुद्धच्या लढतीपूर्वी किवींना धक्का

ऑस्ट्रेलियात शुभमन गिलने टीम इंडियाच्या डावाला चांगली सुरुवात करुन दिल्याचे पाहायला मिळाले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्धची खराब कामगिरी डोक्यातून काढून टाकत नव्या इराद्यासह तो मैदानात उतरणे अपेक्षित आहे. चेतेश्वर पुजाराही टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमधील महत्त्वाचा घटक असून त्याच्याकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिल्यास टीम इंडियाचे पारडे जड आहे.

हेही वाचा: French Open : मारियानं गत सम्राज्ञी इगाला दाखवला इंगा!

दोन्ही संघात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारत 185 सामने खेळवण्यात आले आहेत. यात टीम इंडियाने 82 सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने 69 सामने जिंकले आहेत. कसोटीमध्येही भारतीय संघच आघाडीवर आहे. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 59 कसोटी खेळल्या आहेत. यात टीम इंडियाने 21 तर न्यूझीलंडने 12 कसोटी सामने जिंकले आहेत. वनडेत टीम इंडिया 110 न्यूझीलंड 55 तर टी-20 मध्ये न्यूझीलंडने 8 तर भारतीय संघाने 6 सामन्यात विजय नोंदवलाय.