INDvsNZ : पावसानं जागवल्या वर्ल्ड कपच्या कटू आठवणी

चॅम्पियन होण्याची हाऊस आणि साउदम्टनमध्ये पडणारा पाऊस या समीकरणामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड कपचा सेमीफायनल सामना आठवला असेल.
INDvsNZ
INDvsNZICC Twitter

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आता राखीव दिवस महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया घालवला असल्यामुळे उर्वरित चार दिवसात सामन्याचा निकाल लागला नाही तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल. आयसीसीने मेगा फायनलासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. चॅम्पियन होण्याची हाऊस आणि साउदम्टनमध्ये पडणारा पाऊस या समीकरणामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड कपचा सेमीफायनल सामना आठवला असेल. (You-Remeber-india-vs-new-zealand-icc-wtc-final-rain-connection-world-cup-2019-semifinal-against-new-zealand)

2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनल सामना रंगला होता. मँचेस्टरच्या मैदानात रंगलेला सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर राखीव दिवसात सामन्याचा निकाल लागला होता. या सामन्यात भारतीय संघाला 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

INDvsNZ
WTC INDvsNZ : पावसाची 'कसोटी'; पहिला दिवस पाण्यात!

9 जुलै 2019 मध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकला. पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यांनी 8 गड्यांच्या मोबदल्यात 239 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 46.1 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या असताना पावसाला सुरुवात झाली. राखीव दिवशी पुन्हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. राखीव दिवस भारतीय संघाला गोत्यात आणणारा ठरु नये, अशीच भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.

2002 चॅम्पियन ट्रॉफीची फायनलही पावसामुळे दोन वेळा झाली होती रद्द

29 सप्टेंबर 2002 मध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे रंगलेल्या ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्यांदा श्रीलंकेने टॉस जिंकून फलंदाजी केली. श्रीलंकने 5 बाद 244 धावां केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 2 षटकात 14 धावा करत दमदार सुरुवात केली. पण पावसाचा व्यत्यय आला आणि सामना स्थगित करावा लागला.

INDvsNZ
WTC Final 2021 : संजना-बुमराहच्या मुलाखतीवर कमेंटची 'बरसात'

राखीव दिवशी हा सामना पुन्हा नव्याने खेळवण्यात आला. यावेळी देखील श्रीलंकेनेच टॉस जिंकला. त्यांनी 7 बाद 222 धावा केल्या. टीम इंडियाने 8.4 षटकात 1 बाद 38 धावा केल्यानंतर पुन्हा पाऊस झाला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली. यावेळी भारत-श्रीलंका यांना संयुक्त जेतेपद देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com