Suryakumar Yadav : 3 मॅच 3 गोल्डन डक... पण आपला सूर्या पुन्हा...; सिक्सर किंगचे ट्विट चर्चेत

Yuvraj Singh on Suryakumar Yadav
Yuvraj Singh on Suryakumar Yadavesakal

Yuvraj Singh on Suryakumar Yadav : टी-20 फॉरमॅटचा मिस्टर 360 सूर्यकुमार यादव फक्त एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने एक अतिशय लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.

सलग तीन सामन्यांत तो गोल्डन डकवर बाद झाला. याच कारणामुळे SKY ला याआधी खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता, मात्र यादरम्यान युवराज सिंग आता स्टार फलंदाजाच्या मदतीला आला आहे.

Yuvraj Singh on Suryakumar Yadav
DC vs MI WPL 2023 Final : फायनलचा थरार! कधी, कुठे अन् कसा पाहायचा हे जाणून घ्या?

भारतीय संघाचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून सूर्यकुमार यादवला त्याच्या वाईट काळात पाठिंबा दिला आहे. खरे तर सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरी केली, पण आगामी काळात तो पुन्हा एकदा उत्कृष्ट क्रिकेट खेळून भारतीय संघाला विजय मिळवून देईल, असा विश्वास युवीला वाटतो.

Yuvraj Singh on Suryakumar Yadav
IPL 2023 Sponsors : आमच्यावर भरोसा नाही का? आयपीएलमधून अनेक स्पॉन्सरची माघार; जाणून घ्या नेमकं काय झालं

युवराज सिंगने लिहिले की, 'प्रत्येक खेळाडू आपल्या कारकिर्दीत चढ-उतारांमधून जात असतो. आपण सर्वांनी कधी ना कधी याचा अनुभव घेतला आहे. मला खात्री आहे की सूर्यकुमार यादव हा भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. संधी मिळाल्यास तो विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावेल. सूर्या पुन्हा एकदा उगवेल म्हणून तो पुनरागमन करू शकतो.

Yuvraj Singh on Suryakumar Yadav
IPL 2023 Sponsors : आमच्यावर भरोसा नाही का? आयपीएलमधून अनेक स्पॉन्सरची माघार; जाणून घ्या नेमकं काय झालं

युवराज सिंगनेही आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. 2011 मध्ये विश्वचषकादरम्यान युवराज करिअरच्या शिखरावर होता, मात्र त्याच दरम्यान त्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.

युवराजने या प्राणघातक आजारातून योद्ध्याप्रमाणे विजय मिळवला, पण त्यानंतर जेव्हा तो मैदानात परतला तेव्हा त्याच्या फॉर्मने त्याला फारशी साथ दिली नाही. असे असूनही युवराजने कठीण परिस्थितीतही भारतीय संघासाठी भरपूर क्रिकेट खेळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com