Yuzvendra Chahal VIDEO : बिचाऱ्या चहलचं एक सँडविच कितीजण वाटून खाल?

Yuzvendra Chahal Viral Video
Yuzvendra Chahal Viral Videoesakal

Yuzvendra Chahal Viral Video : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात माऊंट माउंगानुईमध्ये झालेला दुसरा टी 20 सामना भारताने 65 धावांनी जिंकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताच्या 191 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडचा संघ 126 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून दीपक हुड्डाने 4 तर युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. दरम्यान, सामन्यात अनेकवेळा पावसाचा व्यत्यय आला. यादरम्यान, संघाला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. असाच युझवेंद्र चहलचा एक पॅव्हेलियनमधी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात चहलचे एक सँडविच अनेकजण वाटून खाताना दिसले.

Yuzvendra Chahal Viral Video
Steve Smith VIDEO : स्मिथनं फ्री हिटवर केलं असं काही की स्वतःचंच करून घेतलं हसं

पावसामुळे सामना थांबल्यानंतर दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्ये जात होते. त्यावेळी कॅमेरा पॅव्हेलियनकडे वळला. यावेळी कॅमेऱ्यात युझवेंद्र चहल हा सँडविच खाताना दिसत होता. दरम्यान, शेजारी उभ्या असलेल्या शार्दुल ठाकूरने युझवेंद्र चहलचे उष्टे सँडविच हातातून खेचून स्वतः खालले. त्यानंतर मोहम्मद सिराजने देखील युझवेंद्र चहलच्या सँडविचवर डल्ला मारला. सध्या हा ड्रेसिंगरूममधील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडमधील दुसरा टी 20 सामना तब्बल 65 धावांनी जिंकत वर्ल्डकपमधील सेमी फायनल सामन्यातील पराभवाच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. भारताने प्रथम फंलदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या झंजावाती 111 धावांच्या जोरावर 191 धावांपर्यंत मजल मरली. मात्र गोलंदाजांनीही ओल्या मैदानावर देखील प्रभावी मारा करत न्यूझीलंडला 126 धावात गुंडाळले.

दरम्यान, भारतीय संघाचे गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये कसून मारा केला. त्याचा फायदा नंतर फिरकीपटूंना देखील झाला. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये अंतिम 11 च्या संघात खेळण्याची फारशी संधी न मिळालेल्या दीपक हुड्डाने गोलंदाजात कमाल करत 10 धावात 4 विकेट घेतल्या. संपूर्ण वर्ल्डकप बेंचवर बसून काढणाऱ्या युझवेंद्र चहलने 26 धावात 2 विकेट्स घेतल्या. या दोघांना मोहम्मद सिराजने 24 धावात 2 विकेट घेत चांगली साथ दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com