Steve Smith VIDEO : स्मिथनं फ्री हिटवर केलं असं काही की स्वतःचंच करून घेतलं हसं

Steve Smith  England tour of Australia 2022
Steve Smith England tour of Australia 2022 esakal

Steve Smith England tour of Australia 2022 : न्यूझीलंडमध्ये भारत यजमानांबरोबर टी 20 मालिका खेळत आहे. तर ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप विजेता इंग्लंड ऑस्ट्रेलियासोबत वनडे मालिका खेळत आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियातने इंग्लंडचा 72 धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने 94 धावांची खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, या सामन्यातील स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Steve Smith  England tour of Australia 2022
Shaheen Afridi : हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला शाहीन म्हणतो 'दुआ में याद रखना!'

स्टीव्ह स्मिथने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 114 चेंडूत 94 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. दरम्यान स्मिथ अवघ्या 6 धावांनी शतक ठोकण्यापासून वंचित राहिला. दरम्यान, स्मिथने 32 व्या षटकात आदिल रशीदच्या गोलंदाजीवर असं काही केलं की मैदानात सर्वत्र हाशा पिकला. स्मिथला या षटकात फ्री हिट मिळाली होती. मात्र त्याने स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला तो वाईट पद्धतीने फसला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील या मजेदार प्रसंगाचा आनंद सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत घेतला.

Steve Smith  England tour of Australia 2022
Shreyas Iyer VIDEO : यालाच म्हणतात स्वतःच्या पायावर कुह्राड मारणे! श्रेयस देखील राहुल, पांड्याच्या पंक्तीत

स्टीव्ह स्मिथने या सामन्यात 94 धावांची दमदार खेळी करत एक रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केला. स्मिथने आपल्या 14 हजार आंतरराष्ट्रीय धावा देखील पूर्ण केल्या. याचबरोबर स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाकडून सर्वात वेगाने 14 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू देखील ठरला. याचबरोबर स्मिथने सलग चौथ्या डावात 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा करण्याची कमाल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com