Dhanashree Verma : युझवेंद्रच्या पत्नीला डॉक्टरांनी दिली खुशखबर! पोस्ट करत म्हणाली, 'आता मी...'

Yuzvendra Chahal Wife Dhanashree  Verma
Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma : युझवेंद्र चहल सध्या आयपीएल 2023च्या तयारीत व्यस्त आहे. राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये चहल घाम गाळत आहे. दरम्यान पत्नी धनश्री वर्माच्या एका व्हिडिओने त्यांलाही आनंद दिला आहे.

Yuzvendra Chahal Wife Dhanashree  Verma
IPL 2023 : RCB ला मोठा झटका! दिग्गज सलामीवीर दुखापतीने त्रस्त… संपूर्ण हंगामातून बाहेर?

धनश्रीने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, जो डॉक्टरांनी गुड न्यूज दिल्यानंतर बनवला आहे. हा व्हिडिओ पाहून चहलही खूश झाला आहे. खरे तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये धनश्री जखमी झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यामुळे तिला डान्सपासून दूर राहावे लागले होते.

अनेक महिने डान्सपासून दूर राहिल्यानंतर धनश्रीने रविवारी पुनरागमन केले. तिने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की डॉक्टरांकडून मंजुरी मिळाल्यानंतर मी परतली आहे. तिच्या या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे फिट दिसत आहे.

Yuzvendra Chahal Wife Dhanashree  Verma
Shikhar Dhawan : 'विचार न करता केले लग्न आता...' बायकोसोबत घटस्फोटावर धवनने तोडले मौन

धनश्रीला पूर्णपणे तंदुरुस्त पाहून चहललाही खूप आनंद झाला आहे. धनश्री याआधीही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. ती तिचे सुंदर फोटोच शेअर करत असते. अनेक फोटोंमध्ये ती गुडघ्याची कैप घातलेली दिसली.

चहलबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स संघासोबत आहे. आयपीएल 2023 मध्ये राजस्थान 2 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. राजस्थान संघात येण्यापूर्वी तो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेचा भाग होता. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com