Yuzvendra Chahal Wife : घटस्फोटाच्या चर्चेत धनश्री निघाली माहेरी; स्वतःच दिली मोठी अपडेट

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल अलीकडच्या काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे....
yuzvendra chahal wife dhanashree verma
yuzvendra chahal wife dhanashree vermaेोकोत

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Funny Video : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल अलीकडच्या काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. जेव्हा त्याची पत्नी धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून 'चहल' हे आडनाव काढून टाकले तेव्हा अनेक गोष्टी घडल्या. चहलची पोस्ट आणि धनश्रीचे आडनाव काढून टाकल्यानंतर या जोडप्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे असा अंदाज लावला जात होता. पण चहल आणि धनश्रीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे की आमच्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.

yuzvendra chahal wife dhanashree verma
Asia Cup 2022 : राहुल द्रविडला कोरोनाची लागण; टीम इंडियाला आशिया चषकापूर्वी मोठा धक्का

हा संपूर्ण वाद संपल्यानंतर दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत. धनश्रीने एक इन्स्टाग्राम रील शेअर केला आहे, ज्यामध्ये चहल सोबत पुन्हा एकदा मजेदार व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. या मजेदार व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा म्हणते की, मी एका महिन्यासाठी माझ्या माहेरच्या घरी जात आहे. यानंतर युजवेंद्र चहल आनंदाने नाचू लागतो.

धनश्री वर्माने काही दिवसांपूर्वी इंस्टा अकाऊंटवरून 'चहल' आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर युजवेंद्र चहलने नवीन आयुष्य सुरू होत असल्याची पोस्ट टाकली. यानंतर दोघांमध्ये काहीतरी बरोबर नसल्याचा अंदाज लावला जाऊ लागला. धनश्री वर्मानेही आदल्या दिवशी एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. धनश्री वर्माने या पोस्टमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे डान्स करू शकत नसल्याचे लिहिले आहे.

yuzvendra chahal wife dhanashree verma
Yuzvendra Chahal Wife : धनश्री वर्माने युझवेंद्र चहलसोबतच्या नात्यावर तोडले मौन; 'मी शस्त्रक्रिया...'

धनश्री वर्माच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी सांगितले की, तिला पुन्हा डान्स करायचा असेल तर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. ती पुढे लिहिते की, परिस्थिती अनुकूल नव्हती, खूप आव्हानात्मक परिस्थिती होती, पण पती युजवेंद्र चहलचा पूर्ण पाठिंबा मिळाला. युझवेंद्र चहलनेही धनश्री वर्माच्या लांबलचक पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि एक प्रेम इमोजी पोस्ट केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com