Accident Reason : ऋषभ पंत, मुंडे, गोरे अन् आता योगेश कदम; हिवाळ्यात एवढे जास्त अपघात का होतात?

खरंच हिवाळ्यात अपघात जास्त होतात का?
Accident Reason
Accident Reasonsakal

Accident Reason : गेल्या काही दिवसात अपघाताची सिरीजच पाहायला मिळाली. सुरवातीला क्रिकेटर ऋषभ पंत त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, आमदार गोरे अन् आता शिंदे गटाचे आमदार योगेश कदम. पण तुम्ही एक गोष्टीचं निरीक्षण केलं का? ते म्हणजे हे अपघात आता हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर झाले. खरंच हिवाळ्यात अपघात जास्त होतात का? आणि जर हो तर आज आपण या मागील कारणे जाणून घेणार आहोत. (Accident Reason Rishabh Pant dhananjay munde jaykumar gore yogesh kadam why most of the accident happen in winter season )

  • हिवाळ्यात अपघात होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्रचंड धुके आणि धुक्यामुळे न दिसणारे रस्ते.

  • हिवाळ्यात धुक्यामुळे वाहन चालवणे कठीण होतं ज्यामुळे अपघात होतात.

  • हिवाळ्यात वाहनचालकांना समोरचा रस्ता दिसत नसल्यामुळे अपघात होतात पण यावेळी जर तुम्ही हेडलाइट्स सुरू करावेत.

  • कारण धुक्यात जर हेडलाईट्स चालु केले नाही तर अपघात होण्याची शक्यता आणखी वाढते.

Accident Reason
Rishabh Pant Ligament Surgery : ऋषभ पंतवर होणारी लिगामेंट सर्जरी नेमकी काय?
  • हिवाळ्यात गाडी चालवताना कमी बीमचा वापर करा. नाहीतर प्रकाश दिसणार नाही. लो बीम वापरा जेणेकरुन रस्ता दिसू शकेल.

  • धुक्यात वेगाने गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर ब्रेक लावणे कठीण जातं ज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.

  • धुक्यांमध्ये गाडी लेनमध्ये चालवा. लेनला तोडू नका. रस्त्याबाजूला असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांकडे लक्ष असावे

  • तलाव किंवा नदीजवळून जाताना वाहन सावकाश चालवा, दाट धुके असल्यास वाहनाचे चारही इंटीकेटर लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com