esakal | अद्भूत शिवमंदिरातील अखंडित ज्वाळांचं रहस्य! वैज्ञानिकांनाही न सुटलेलं कोड
sakal

बोलून बातमी शोधा

shiv mandir

अद्भूत शिवमंदिरातील अखंडित ज्वाळांचं रहस्य!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतासह इतर देशांमध्येही भगवान महादेवाची (Mahadev Temples) अनेक मंदिरं आहेत. पण सध्या एका शिवलिंगातची चर्चा सोशल मीडियावर (social media) जोरदार सुरू आहे. असं म्हणतात कि ते एक चमत्कारिक शिवमंदिर असून त्याठिकाणी असणाऱ्या अग्निकुंडातून सातत्यानं ज्वाळा निघत असतात. ज्या कोणत्याच ऋतूत विझत नाही..हो हे खरं आहे. आणि त्यामुळेच हे शिवलिंग वैज्ञानिकांना न उलघडलेलं एक कोड आहे. जेव्हा या मंदिराचे फोटोज ट्विटरवर शेअर झाले. तेव्हा ती पाहणाऱ्यांना विश्वास बसला नाही.. वाचा सविस्तर....

सातत्याने निघणाऱ्या ज्वाळांचं रहस्य

बांगलादेशात असणारे प्राचीन शिवमंदिर लोकांचे श्रध्दास्थान व चमत्कारिक आहे. या शिव मंदिरातील अग्निकुंडातील ज्वाळा सर्वसामान्य लोकांसह वैज्ञानिकांना देखील आश्चर्यचकित करत आहेत. आणि यामुळेच भाविकांमध्ये सध्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. या अद्भूत मंदिराविषयी लोकांना फारशी माहिती नव्हती. पण जेव्हा याचे फोटो ट्विटरवर शेअर झाले. तेव्हा या शिव मंदिराची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. या शिव मंदिरात भक्त या अग्निकुंडात सातत्यानं निघणाऱ्या दिव्य ज्वाळांचं दर्शन घेतात. या बिना इंधन ज्वाळा कशा निघतात..? कधीच का नाही विझत? याविषयी आजही कोणालाही माहिती नाही. तरीदेखील या ज्वाळा अखंडपणे पेटतात. यामुळे भाविक याला महादेवाचा एक चमत्कारच मानतात.

हेही वाचा: वाढदिवस साजरा करताय? अभिनेत्रीने केलेली चूक तुम्ही करू नका!

सोशल मिडियावर चर्चा; twitter वर छायाचित्रे शेअर

संपूर्ण जगासाठी हे मंदिर आश्चर्यचा एक केंद्रबिंदू ठरले आहे. बांगलादेश हिंदू युनिटी काउंसिलनं ही छायाचित्र शेअर करताना म्हटलं आहे की, अग्निकुंड महादेव मंदिर हे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर चित्तगाव येथे आहे. या मंदिरात नेहमीच आगीच्या ज्वाळा तेवत असतात. याविषयीचा शोध अद्याप एकही पुरातत्व अभ्यासक किंवा तज्ज्ञ लावू शकलेला नाही. या मंदिराचं अग्निकुंड महादेव मंदिर असं नामकरण करण्यात आलं आहे.

हेही वाचा: सर्वसामान्यांप्रमाणं मृत्यूनंतर साधूंचं दहन का केलं जात नाही? जाणून घ्या...

काउंसिलने केलं ट्विट; प्रतिक्रियांचा पाऊस

ही छायाचित्रं पाहून हर-हर महादेव अशा कॉमेंटस या पोस्टवर नेटिझन्स देत आहेत. काही लोकांनी मंदिराच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

loading image
go to top