
ऐन उन्हाळ्यात लिंबाच्या सालीवर बुरशी येते का? या चार टिप्स फॉलो करा
सध्या महाराष्ट्रसह देशभर कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे आणि उन्हाळ्यात लिंबाचा सर्वाधिक वापर केला जातो मात्र अशातच सध्या लिंबाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. लिंबू सरबत अनेकांना आवडतं. लिंबू महाग असल्याने लोकांना लिंबू घेणे परवडत नाही तर अनेकदा लिंबूच्या सालीवर बुरशी येते. मग अशात आपण लिंबू खरेदी करण्यास संकोच करतोय पण आज आम्ही तुम्हाला लिंबू जास्त काळ कसे साठवायचे याबद्दल सांगणार आहोत.
हेही वाचा: घामाच्या दुर्गंधीपासून सुटका पाहिजे? या सात टिप्स फॉलो करा
१.लिंबू एक अशी गोष्ट आहे जी खूप लवकर सुकते. वाळलेल्या लिंबातून थोड्या प्रमाणातच रस निघतो. अशा परिस्थितीत आता ते कसे साठवायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर लिंबू खरेदी करताना सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की लिंबू जास्त पिकलेले किंवा जास्त कच्चेही नसावे. त्यामुळे लिंबू नेहमी हलके पिकल्यावरच आणावे.
२. लिंबाची साल देखील त्वचेसाठी खूप चांगली मानली जाते. खरं तर, त्यात अँटी-एजिंग आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळे पाण्यात उकळून ते केस धुण्यासाठी आणि फेसवॉशसाठी वापरता येते. यामुळे केस खूप मऊ होतील.
हेही वाचा: छोट्या शेफची भन्नाट पाककृती होतीय व्हायरल
३. लिंबू स्वस्त असेल तर साठवून ठेवू शकता. प्रथम सर्व लिंबाचा रस काढून घ्या. त्यानंतर बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. यानंतर तुम्ही ते सरबत शिकंजीमध्येही वापरू शकता.
४.लिंबू फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच पिळू नये. लिंबू बराच काळ साठवण्यासाठी, वर्तमानपत्राच्या कागदाचे छोटे तुकडे करा. आता या तुकड्यांमध्ये प्रत्येकी एक लिंबू गुंडाळा. त्यानंतर कागदाच्या पिशवीत टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा. असे लिंबू ठेवल्याने महिनाभर ताजे राहते.
Web Title: As Lemons Are Expensive How To Store Lemon For A Long Time Check Here Some Easy Way
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..