Astro Tips: वारंवार येणाऱ्या अडचणींनी त्रस्त आहात? स्मशानातील 'ही' एक वस्तू करेल मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips: वारंवार येणाऱ्या अडचणींनी त्रस्त आहात? स्मशानातील 'ही' एक वस्तू करेल मदत

घरातल्या सदस्यांच्या मागे सतत दवाखाना लागला की आपला वाईट काळ सुरू झालाय असे म्हणतात. एकामागे एक असे घरातील सर्व सदस्य आजारी पडतात. त्यावेळी अनेक उपचार करूनही काही आजारांचे निदान लागत नाही. त्यावेळी शास्त्र, पुराणातील काही उपायांचा आधार घ्यावा लागतो. असाच एक उपाय जाणून घेऊया.

घरात सतत येणाऱ्या अडचणींवर शास्त्रात अनेक उपाय आहेत. स्मशनभुमीसारख्या ठिकाणाला लोक नकारात्मक उर्जेचे क्रेंद्र मानतात. या ठिकाणी माणूस मेल्यावर जातो किंवा कोणाला तरी दहन करायला जातो. पण, आज आम्ही जो उपाय सांगणार आहे तो स्मशनभूमीशी संबंधित आहे. स्मशानभूमीतील एक वस्तू तूमच्या अडचणी दूर करण्यास मदत करेल. ती कोणती ते पाहुयात. (Astro Tips)

हेही वाचा: Astro Tips : घरामध्ये तुळस का असावी? या दिशेला ठेवा तुळस, नेहमी फायदा होईल

काय सांगते शास्त्र

ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार स्मशानभूमीच्या मातीमध्ये खूप शक्ती असते असे मानले जाते. कारण या मातीवर चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे दहन केले जाते. स्मशानभूमीच्या मातीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात असेही म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्यातही ती मदत करते असे शास्त्रात म्हटले आहे. (Negative Effect)

रूपयाचे नाणे

स्मशानातील वातावरण भितीदायक असले तरी तिथे जाऊन हा उपाय करावा लागणार आहे. स्मशानभूमीत जाऊन एक रूपयांची काही नाणी पसरवायची आहेत. कबुतराला दाणे टाकतो तशी ही नाणी तूम्हाला स्मशानात फेकायची आहेत. हे काम करताना केवळ देवाचे नामस्मरण करावे. तूमच्या अडचणी, कुटुंब यांचा विचार करू नका.

आजारापासून मुक्तीसाठी उपाय

जर घरात कोणी आजारी असेल. त्याच्यावर औषधांचा फरक पडत नसेल तर तर रात्रीच्या वेळी रुग्णाच्या डोक्यावर तांब्याचे नाणे ठेवावे. ते नाणे दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत फेकून द्या. यामुळे औषधाचा परिणाम दिसून येईल. त्या व्यक्तीची लवकरच या आजारातून सुटका होईल.

तूमच्या कुंडलीत चंद्र अशुभ दिशेत असल्याने त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी मातीच्या भांड्यात स्मशानातील पाणी आणून त्यात चांदीचा चौकोनी तुकडा ठेवावा. हे भांडे घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. या उपायाने आर्थिक संकट मजबूत होते आणि कामातील अडथळे देखील आपोआप दूर होतात.

हेही वाचा: Healthy Lifestyle: जेवणानंतर पान खायला आवडतं? मग हे वाचाच

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. हे उपाय करण्यापूर्वी ज्योतिष्य तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.

टॅग्स :Astrologyhealth