Astro Tips for Money: पैसे खिशात राहत नाही, म्हणून आजच या सवयी बदला

प्रत्येकाला आयुष्यात श्रीमंत व्हायचे असते, परंतु अनेक वेळा असे घडते की, प्रचंड मेहनत करूनही खिशात पैसाच टिकत नाही.
Astro Tips for Money
Astro Tips for Moneysakal
Updated on

ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही चुकाविषयी सांगितले आहे की ज्या चुका केल्या की त्यामुळे व्यक्तीला पैशाची चणचण येऊ शकते. प्रत्येकाला आयुष्यात श्रीमंत व्हायचे असते, परंतु अनेक वेळा असे घडते की, प्रचंड मेहनत करूनही खिशात पैसाच टिकत नाही. पैसा न टिकण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु ज्योतिष अशा काही चुकाविषयी सांगितले आहे की ज्या चुका केल्या की त्यामुळे व्यक्तीला पैशाची चणचण येऊ शकते. त्यामुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे. ज्योतिष टिप्स फॉर मनीमध्ये अशा काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या सवयी बदलून माणूस श्रीमंत होऊ शकतो.

चला यर मग आज जाणून घेऊया, श्रीमंत होण्यासाठी आपल्या कोणत्या सवयी बदलायला हव्यात याविषयीची सविस्तर माहिती

Astro Tips for Money
Name Astrology: J अक्षरापासुन नाव सुरू होणाऱ्या लोकांना थोड्या मेहनतीनेच यश मिळते

● दातांने नखे कुडतडू नये.

ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, व्यक्तीने दातांनी नखे कुडतडू नयेत. असे केल्याने आपल्या राशीतील सूर्य अशक्त होतो आणि आपोआप आपल्या धनात घट यायला सुरुवात होते. तसेच भागवत पुराणात सांगितले आहे की खुडलेल्या खिळ्याने जमीन खोदू नये. यामुळे धनाची देवी लक्ष्मी कोपते आणि टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते.


● दररोज नियमितपणे अंघोळ करणे.

बहुतेक लोक रोज अंघोळ करतात पण काही लोक कामाच्या घाईमुळे किंवा आळशीपणामुळे अंघोळ करत नाहीत. ही एक वाईट सवय मानली जाते. तसेच जे लोक आजूबाजूला स्वच्छतेची काळजी घेत नाहीत, त्यांच्या कुंडलीत शुक्र दोष निर्माण होऊ शकतो. यामुळे अशा लोकांना पैशाची कमतरता किंवा आर्थिक समस्या येऊ शकते.

Astro Tips for Money
Home Tips : भिंतीवरील जाळ्यांनी वैतागलात? 'या' ट्रिक्स वापरा, लगेच मिळेल सुटका

● पाय घासत चालणे टाळावे.

पाय घासत चालणे हे चुकीच्या वर्तनाच्या श्रेणीत येत.त्यामुळे असे चालणे ज्योतिषशास्त्रातही चुकीचे मानले गेले आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात पैशाचा अपव्यय वाढू शकतो आणि व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत पाय घासत न चालण्याची सवय लावा.

● घरातील समान निटनेटके ठेवा.

लक्ष्मी टिकण्यासाठी तुमच्या घरातील स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. अशा ठिकाणी माता लक्ष्मी स्वतः वास करते. त्यामुळे घरातील वस्तू इकडे तिकडे पसरवू नका आणि रात्री झोपण्यापूर्वी खरकटी भांडी स्वच्छ करा. तसेच शूज आणि चप्पल त्यांच्या जागी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. या सवयीतून अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.

● तुमची ही सवय देखील लगेच बदला.

खुप लोक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर जागा मिळेल तिथे थुंकतात असे अनेकवेळा दिसून आले आहे. लोकांच्या अशा कुठेही थुंकण्याच्या सवयीमुळे सुध्दा तुमचे पैसे बुडू शकतात. त्यामुळे तुमची ही घाणेरडी सवय ताबडतोब बदला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com