लॉकडाऊनमध्ये रक्तातील साखर कंट्रोल करायचीय? हे पदार्थ टाळा!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

मधुमेहापासून बचाव करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा एक सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे निरोगी आहार. 

मधुमेहापासून बचाव करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा एक सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे निरोगी आहार. आपल्या आहारातील काही पदार्थ टाळून त्यावर सहज नियंत्रण मिळविता येऊ शकते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मधुमेहाने ग्रास्त असलेल्या व्यक्तीला, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे खूप महत्वाचे असते. मधुमेह एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी सतत नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा एक सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे निरोगी आहार . आपल्या आहारात असलेले पदार्थ आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करतात. आपल्या  रोजच्या आहारात अश्या काही पदार्थांचा समावेश असतो जे रक्तातील साखरेच्या पातळीवर नकारात्मक परिणाम करीत नाहीत, परंतू काही असे पदार्थ आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडू शकते. असे काही पदार्थ आहारात आपण टाळले पाहिजेत. जेणेकरुन रक्तातील साखरेच्या पातळीत होणारे मोठे चढउतार टाळता येतील. रक्तातील निरोगी साखरेसाठी आजच आहारातील हे पदार्थ खाणे थांबवा. 

लॉकडाऊनमध्ये घरात मुलांशी कसं वागताय? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

१. साखरयुक्त पेय
बहुतेक पेय विशेषतः कार्बोनेटेड पेये आणि शीत पेये टाळली पाहिजेत. त्यामध्ये बरीच साखर असते ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. आपण हर्बल चहासारखे निरोगी पर्याय निवडले पाहिजेत.

२. फळांचा रस
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. मधुमेह रूग्णांना संयमाने फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, परंतु फळांचा रस शक्य तितका टाळला पाहिजे. फळांच्या रसात फायबर नसते. एक ग्लास रस तयार करण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात फळांची आवश्यकता असते ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते. 

3. डबाबंद खाद्यपदार्थ (पॅक स्नॅक्स)
डबाबंद खाद्यपदार्थ (पॅक स्नॅक्स) हा आहारातील एक चवदार पर्याय आहे परंतु ते आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीसाठी हानिकारक असू शकतात. हे स्नॅक्स कृत्रिम फ्लेवर्सनी भरलेले असतात. आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. जर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची इच्छा असेल तर आपण उकडलेले अंडी, चणे, बदाम, प्रथिने बार किंवा पॉपकॉर्न घेऊ शकता.

लॉकडाऊनमध्ये तुमच्या पुढच्या पिढीला काय देताय?

4. साखरयुक्त दही (योगर्ट):
दही हा एक निरोगी नाश्ता असून त्याचे आरोग्याला बरेच फायदे आहेत. मधुमेह रुग्णसुद्धा आहारात दही घेऊ शकतात, परंतु साखरयुक्त दही (योगर्ट) खाणे टाळा. कारण यामध्ये साखरचे प्रमाण जास्त असते. जाते.

5. पांढरा ब्रेड
पांढर्याप ब्रेडमध्ये कार्ब्सचे प्रमाण जास्त असते. त्यांच्यावर बर्याटपैकी प्रक्रिया केली जाते. हे प्रक्रिया केलेले पदार्थ रक्तातील साखरेचे शोषण कमी करू शकतात. आपल्या नाश्त्यासाठी पांढर्याा ब्रेडचा पर्याय टाळून निरोगी पर्याय निवडला पाहिजे.

टीप: ही माहिती केवळ सल्ला म्हणून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सल्ल्याला हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. सकाळ या माहितीची जबाबदारी घेत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid these foods to control blood sugar