Ayutthaya Thailand: खरं की काय! भारतातच नाहीतर थायलंडमध्येही आहे ६७४ वर्षांपूर्वीची अयोध्या?

युनेस्कोने हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे
There is a 674 year old Ayodhya style temple in Thailand
There is a 674 year old Ayodhya style temple in Thailand esakal

Ayutthaya Thailand:

गेल्या काही वर्षांपासून अयोध्येचे नाव सतत चर्चेत आहे. अयोध्येत उभे राहणारे राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. भारतात पुन्हा एकदा अयोध्येचे राजा श्री राम हे मंदिरात विराजमान होणार आहेत. भारतासह जगभरात हे राम मंदिर चर्चेचा विषय बनले आहे. असे असताना भारतातच नाहीतर देशाबाहेरही एकेठिकाणी अयोध्या नगरी आहे, असा दावा केला जात आहे.   

भारताबाहेर थायलंडमध्ये ६७४ वर्षे जुने ठिकाण आहे, जिथे अनेक मंदिरे आणि त्यांचे अवशेष आहेत. या ठिकाणाचे नाव भारतातील अयोध्यासारखे आहे. युनेस्कोने हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे ठिकाण इतिहासप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.

There is a 674 year old Ayodhya style temple in Thailand
रावणाची लंका सोन्याची होती तर प्रभू श्रीरामाची अयोध्या कशी होती? जाणून घ्या प्राचीन ग्रंथात काय लिहिलंय?
Ayutthaya Thailand
Ayutthaya Thailandesakal

या प्राचीन शहराची स्थापना 1350 मध्ये रामाठीबोडी प्रथम याने केली होती. या शहराने चार शतकांहून अधिक काळ सियामी साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जात होते. या शहराचे नाव आयुथया आहे.हे प्राचीन शहर चाओ फ्राया नदीच्या काठी वसलेले आहे. एकेकाळी हे शहर सागरी व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र होते.

थेरवडा बौद्ध धर्म आणि हिंदू-ब्राह्मण परंपरा यांचे सुंदर मिश्रण या शहरात पाहायला मिळते. या ठिकाणालाच अयुथ्याअसे नाव देण्यात आले आहे. अयोध्या रामायण आणि हिंदू धर्माशी संबंधित आहे.

अशा परिस्थितीत या प्राचीन शहरातही रामायणाचा प्रभाव आहे. अयुथ्या पहिला शासक, राजा रामाथीबोडी याने या शहराचे नाव अयुथ्या ठेवले, जे या प्रदेशाच्या संस्कृतीवर रामायणाचा प्रभाव प्रतिबिंबित करते.

There is a 674 year old Ayodhya style temple in Thailand
Mumbai-Ayodhya Flight : मुंबई ते अयोध्या थेट विमानसेवा कधीपासून सुरू होणार? 'इंडिगो'ने दिलं उत्तर
Ayutthaya Thailand
Ayutthaya Thailandesakal

रामायण आणि इथल्या राजांचा संबंध इतका प्राचिन आहे, की इथल्या राजांच्या नावावरही राम ही पदवी आहे. भारताप्रमाणे थायलंडचीही श्रीरामावर अपार श्रद्धा आहे. येथेही भगवान श्रीरामाची पूजा केली जाते.

अयुथ्याच्या राजाने या शहरात काही हिंदू मंदिरेही बांधली आहेत. अयुथ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर भगवान विष्णू, ब्रह्मा आणि शंकराची मंदिरे आहेत. प्रभू रामाशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी येथील राजांनी आपल्या नावात राम हे नाव जोडले. हे लोक स्वतःला प्रभू रामाचे वंशज मानतात.

There is a 674 year old Ayodhya style temple in Thailand
कागल : २२ जानेवारीला साक्षात अयोध्या अवतरूया - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
Ayutthaya Thailand
Ayutthaya Thailandesakal

आजही इथल्या राजांना राम म्हणतात

बँकॉकमध्ये सुवर्णभूमी विमानतळ आहे. येथे तुम्हाला राम स्ट्रीट आणि अशोक स्ट्रीट अशी नावे मिळतील. शतकानुशतके येथील राजघराण्यांवर हिंदू धर्माचा खोलवर प्रभाव आहे. थायलंडचे राष्ट्रीय चिन्ह गरुड आहे. येथील राजघराणे आयुथ्यातच राहतात. हे ठिकाण बँकॉकपासून 50-60 किलोमीटर अंतरावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com