Banana Milk Shake : उन्हाळ्यात स्पेशल पाहुण्यांना सरबत नाहीतर हेल्दी बनाना मिल्क शेक द्या, रेसिपी आहे एकदम सोप्पी

केळीच्या शेकमध्ये नेहमी कच्चे दूध वापरावे
banana milk shake recipe in marathi
banana milk shake recipe in marathiesakal

Banana Milk Shake :

उन्हाळ्यात सतत काहीतरी थंड प्यावंस वाटत असतं. सरबत आणि ज्यूस पिऊन आणि बनवून गृहिणी त्रासलेल्या असतात. त्यामुळे स्पेशल पाहुण्यांसाठी तुम्ही बनाना मिल्क शेक बनवू शकता. केळी जास्त गोड नसतात त्यामुळे ते खाण्यासाठी चांगले असतात. आणि त्याने पोटही भरलेले राहते.

याची खास गोष्ट म्हणजे, बनाना मिल्क शेक केल्याने दुधाला वेगळी चव येते. आणि जी मुलं दूध पिण्याचा कंटाळा करतात तेही हा शेक पटकन संपवतात. मिल्क शेक प्यायल्याने मुलांना एनर्जी मिळते आणि उन्हातील उष्माघाताचे आजार होत नाहीत. (Recipe)

banana milk shake recipe in marathi
Sewai Upma Recipe : नाश्त्याला झटपट बनवा गरमागरम शेवई उपमा, पोट ही भरणार अन् चवदारही होणार!

साहीत्य –

  • केळी २

  • मध १ चमचा

  • साखर १ चमचा

  • वेलची पावडर १ छोटा चमचा

  • कच्चे दूध २ कप

  • बर्फ, टूटी-फ्रूटी आणि ड्रायफ्रूट्स

कृती

  1. सर्वात आधी मिक्सर किंवा ज्यूसरमध्ये केळीचे बारीक तुकडे आणि मध,साखर घालून एकदा फिरवून घ्या. (Healthy Recipe)

  2. यानंतर दूध आणि वेलची पावडर घालून पुन्हा बारीक करून घ्या.

  3. यानंतर हे मिश्रण एका ग्लासमध्ये काढा त्यावर ड्रायफ्रूट्स आणि टूटी-फ्रूटी घालून सजवा.

banana milk shake recipe in marathi
Banana Crop Insurance Jalgaon : केळी फळ विम्याबाबत शेतकऱ्यांच्या 18 मागण्या मान्य

महत्त्वाची टिप

  • केळीच्या शेकमध्ये नेहमी कच्चे दूध वापरावे. जर तुम्हाला शेक खूप गोड आवडत नसेल तर त्यात साखर वापरू नका कारण केळी देखील गोड असते.

  • टूटी- फ्रुटी आणि ड्रायफ्रुट्स हे पर्यायी आहेत, त्यामुळे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुटी फ्रुटीशिवाय शेक बनवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com