Uttarakhand News: गारठ्यामुळं वीटभट्टीभोवती शेक घेत असताना कोसळली भिंत; 6 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर

Uttarakhand Brick Kiln Wall Collapse News: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये भीषण अपघात झाला आहे. मंगलौरच्या लहाबोली गावाजवळील माजरा मार्गावर असलेल्या वीटभट्टीची भिंत कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Uttarakhand News
Uttarakhand NewsEsakal

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये आज (मंगळवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. मंगलौरच्या लहाबोली गावाजवळील माजरा मार्गावर असलेल्या वीटभट्टीच्या भिंत कोसळली. या भिंतीखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोतवाली मंगलौर परिसरातील लहाबोली गावात शानवी ब्रिक्स फील्ड नावाची वीटभट्टी आहे. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 मजूर एकत्र आगीजवळ बसून शेकत होते . जवळच एक कच्च्या विटांची भिंत होती जी अचानक कोसळली. त्यात सर्व कामगार गाडले गेले.

Uttarakhand News
Nashik Accident News : उड्डाण पुलावर अपघातामुळे वाहनांच्या लागल्या रांगा

विटा वाहून नेणाऱ्या काही जनावरांचाही मृत्यू झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून कामगारांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला होता. एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) प्रमेंद्र डोभाल यांच्यासह पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Uttarakhand News
Pune Accident : मुठा खिंडीत भरधाव वेगाने आलेल्या डंपरने चारचाकीला ठोकरल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

"मंगलौर पोलीस स्टेशन अंतर्गत लहबोली गावात वीटभट्टीची भिंत कोसळल्याची माहिती आम्हाला सकाळी 8.30 च्या सुमारास मिळाली. किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसएसपी प्रमेंद्र डोभाल घटनास्थळी आहेत", मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. असे जिल्हा पोलिस पीआरओने सांगितले.

Uttarakhand News
Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रीय; येरवडा परिसरात २० ते २५ गाड्यांची केली तोडफोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com