esakal | साप चावल्यावर 'ही' चूक करु नका; अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

Snake

साप चावल्यावर 'ही' चूक करु नका; अन्यथा...

sakal_logo
By
शर्वरी जोशी

साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. पूर्वी जंगलात वास्तव्य करणारे हे प्राणी आता सर्रास मानवी वस्त्यांमध्ये फिरताना दिसत आहेत. गेल्या काही काळात वन्यजीवांचं मानवी वस्त्यांमध्ये येण्याचं प्रमाणही झपाट्याने वाढलं आहे. खरं तर या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. वाढत्या शहरीकरणामुळे जंगले नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे साप किंवा तत्सम सरपटणारे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये दिसू लागले आहेत. पोटाची भूक भागवण्यासाठी भक्ष मिळत नसल्यामुळे ते मानवी वस्तीमध्ये फिरताना दिसतात. मात्र, साप दिसला की आपण लगेच त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तोदेखील माणसावर हल्ला करतो. परिणामी, सापाने दंश केल्यावर अनेकांचा मृत्यू होतो. मात्र, साप चावल्यावर अनेक जण घाबरुन जातात आणि नको नको ते उपाय करतात. परंतु, काही वेळा हे उपायच घातक ठरु शकतात. म्हणूनच साप चावल्यावर कोणत्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे ते जाणून घेऊयात. (health-tips-never-make-mistakes-while-snake-bite)

हेही वाचा: कमोडमध्ये लपलेल्या सापाचा हल्ला; ६५ वर्षीय व्यक्तीला दुखापत

१. साप चावल्यानंतर घाईगडबडीमध्ये आपण लगेच संबंधित व्यक्तीला झोपण्याचा सल्ला देतो. मात्र, साप चावल्यावर कधीही आडवं झोपू नये. असं केल्यामुळे त्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होऊ शकतो. यामुळे विष रक्तात झपाट्याने पसरु शकतं.

२. साप चावल्यावर पाणीदेखील प्यायला देऊ नये अस म्हटलं जातं.

३. साप चावल्यानंतर अनेकदा आपण विष पसरु नये म्हणू त्याजागी पट्टी किंवा रुमाल बांधतो. परंतु, रुमाल बांधल्यामुळे त्या ठिकाणचा रक्तदाब वाढतो आणि रक्तपुरवठा करणारी नस तुटू शकते.

४. साप चावल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं औषध रुग्णाला देऊ नये.

५. बऱ्याचदा दंश केलेल्या ठिकाणी काही जण सुरीने चीर देऊन जखम मोठी करतात. मात्र, असं केल्यामुळे रुग्णाला इंफेक्शन होऊ शकतं. किंवा, विष जलद गतीने शरीरात पसरु शकतं.

loading image