Skin Care Tips: कियारा सारखी सुंदर त्वचा हवी आहे? महागडे स्क्रब शिटने नाही तर फक्त संत्र्याने करा फेस स्क्रब

Natural face scrub: कियाराचे कुठलेही फोटो बघितले तरी त्यात तिचा चेहरा नेहमीच खूप उजळ (Beauty tips) आणि सुंदर दिसतो
Skin Care Tips
Skin Care Tipsesakal

Skin Care Tips: कियारा अडवाणी (Kiara Advani) दिसायला खूप सुंदर आहे, तिच्या ग्लॅमरस अंदाज मध्ये ती नेहमीच आपल्या चाहत्यांचे मन जिंकते. कियाराचे कुठलेही फोटो बघितले तरी त्यात तिचा चेहरा नेहमीच खूप उजळ (Beauty tips) आणि सुंदर दिसतो. 

आपला चेहरा सतेज, नितळ आणि सुंदर दिसावा असं सगळ्याच बायकांना (Women) वाटतं असतं. त्यासाठी अनेकजणी मेहनत घेतात, चांगले प्रॉडक्ट वापरतात, होम रेमेडीज (Home Remedies for skin) करतात तर, काही जणी वेगवेगळे फेसपॅक (Face pack) देखील वापरत असतात. 

चेहरा सुंदर राहण्यासाठी त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कोणतंही प्रॉडक्ट (Beauty Product) वापरताना किंवा होम रेमेडीज करताना त्या आपल्या चेहऱ्याला सूट होतात का? हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे.

उन्हाळ्यात चेहऱ्यावर घाम, प्रदूषण आणि धुळीमुळे तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव होते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर साचलेली घाण काढण्यासाठी स्क्रबिंगची (Face cleaning scrub) गरज असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी ऑरेंज पील फेस स्क्रब घेऊन आलो आहोत. 

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) सारख्या अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे तुमच्या त्वचेला पुरेसे पोषण देतात. यामुळे तुमच्या त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. 

या फेस स्क्रबचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन आणि टॅनिंग दूर होण्यास मदत होते. याशिवाय, तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार बनते, चला तर मग जाणून घेऊया संत्र्याच्या सालीचा फेस स्क्रब कसा बनवायचा.

Skin Care Tips
Skin Care: उन्हाळ्यात सनबर्नचा धोका जास्त! या वस्तूने करा त्वचेचे संरक्षण

ऑरेंज पील फेस स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

(Ingredients for making orgenge peel face scrub pack)

  • 2 ते 3 चमचे दही

  • 2 संत्र्यांची साल

ऑरेंज पील फेस स्क्रब कसा बनवायचा? 

(How to make orange peel face scrub pack)

  • संत्र्याच्या सालीचा फेस स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाडगा घ्या.

  • नंतर त्यात सुमारे २ संत्र्यांची साले बारीक करून टाका.

  • यानंतर त्यात साधारण २ ते ३ चमचे दही घाला.

  • नंतर या दोन गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट बनवा.

  • आता तुमचा संत्र्याच्या सालीचा फेस स्क्रब तयार आहे.

Skin Care Tips
Skin Care: या वाईट सवयी सौंदर्य खराब करू शकतात, आजच त्या सुधारा

ऑरेंज पील फेस स्क्रब कसा लावायचा? 

(How to apply orange peel face scrub pack on face)

  • ऑरेंज पील फेस स्क्रब लावण्यापूर्वी चेहरा धुवून स्वच्छ करा.

  • नंतर संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावा.

  • यानंतर चेहऱ्याला हलक्या हातांनी ५-७ मिनिटे मसाज करा.

  • लक्षात ठेवा हा फेस स्क्रब डोळ्यांपासून दूर ठेवा.

  • त्यानंतर कॉटन पॅड आणि पाण्याच्या मदतीने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.

  • सर्वोत्तम परिणामांसाठी, हे स्क्रब आठवड्यातून 2 वेळा वापरा.

  • याने तुमचा चेहरा उजळ आणि स्वच्छ दिसेल.

किती वेळा स्क्रबिंग करणे योग्य आहे

  • आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा स्क्रबिंग करणे योग्य मानले जाते. 

  • स्क्रबिंग करण्यासाठी बोटावर स्क्रब घ्या आणि त्याला चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमधे अप्लाय करा. 

  • चेहऱ्यावर स्क्रबिंग फक्त दोन ते तीन मिनिटेच करा. 

  • जास्त स्क्रबिंग केल्याचे चेहऱ्याची बाहेरची त्वचा डॅमेज होऊ लागते. 

  • स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्याला थंड्या पाण्याने धुवून घ्या. 

  • अनेक स्त्रिया अपूर्ण माहितीअभावी बऱ्याच वेळ चेहऱ्यावर स्क्रब अप्लाय करतात. 

  • पार्लरमधेसुद्धा १० मिनिटांपर्यंत स्क्रबिंग केली जाते. याचे फायदे कमी आणि नुकसान तुम्हाला जास्त झाल्याचे दिसून येईल. 

  • तुमच्या त्वचेची आऊटर लेयर डॅमेज व्हायला लागते.

Skin Care Tips
Skin Care: उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीने करा बर्फाचा वापर

स्क्रब केल्यानंतर फॉलो करा या स्टेप्स

  • स्क्रब केल्याने चेहरा डिप क्लिन होतो. 

  • त्यामुळे इनर पोअर्स क्लिन होतात आणि तुमची त्वचा कुठलेही प्रोडक्ट शोषण्यास रेडी असते. 

  • पण अनेकदा लोक स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्याला काहीही लावतात. 

  • स्क्रबिंग केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला सुट होणारं मॉश्चरायझर लावा. 

  • जेणेकरून तुमची स्किन चांगली हायड्रेट होईल आणि ग्लोइंग दिसू लागेल.

स्क्रबिंग नक्की कोणी करावे

चेहऱ्यावर स्क्रबिंग करण्याचं योग्य वय 25 आहे. 25 पेक्षा कमी वयाच्या लोकांनी स्क्रॅब करू नये. वयाच्या पंचविशीनंतर चेहऱ्यावर डेड सेल्स बनायला लागतात. पंचवीस पेक्षा कमी वयाच्या लोकांची स्किन हेल्दी असते. त्यामुळे चांगल्या त्वचेवर स्क्रबिंगचा फायदा होणार नाही उलट नुकसान होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com