Healthy Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Healthy Skin Care Tips : तरूण वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या का येतात?, ही आहेत कारणं

सुरकुत्यांचे कारण धुम्रपानही असू शकतं!

Pooja Karande-Kadam

Healthy Skin Care Tips : वाढत्या वयाबरोबर त्वचेवर नैसर्गिकरित्या वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. त्वचा खूप कोरडी, पातळ आणि सैल दिसते. वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेवर बारीक रेषा दिसतात. वयानुसार शरीराच्या अनेक भागांवर सुरकुत्या दिसणे स्वाभाविक आहे.

सूर्याच्या संपर्कात असलेल्या शरीराच्या भागांवर दिसून येतात. यामध्ये हात, चेहरा आणि मान इत्यादींचा समावेश आहे. म्हातारपणी सुरकुत्या येणे खूप सामान्य आहे. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू डोकं वर काढू लागते.

सहाजिकच चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी महिला बाजारातील अनेक केमिकलयुक्त क्रिमचा वापर करतात. या केमिकल्सचा त्वचेवर हळू हळू दुष्परिणाम होऊ शकतो. त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या निर्माण होतात. एकदा तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या की फाईन लाईन्स आणि इतर समस्याही वाढू लागतात. 

हल्ली लहान वयातही सुरकुत्या आणि बारीक रेषांच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. असे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात तरूण वयात कोणत्या गोष्टींमुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा येऊ शकतात.

धूम्रपान

बरेच तरूण लोक धूम्रपान करतात. पण धुम्रपान तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषाही दिसू लागतात. यामुळे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन फायबर्सचे नुकसान होते. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याभोवती सुरकुत्या दिसू लागतात.

चुकीचा आहार

आजकाल लोक घाईगडबडीने किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अस्वास्थ्यकर आहार घेतात. पौष्टिकदृष्ट्या कमकुवत पदार्थ आरोग्यास हानी पोहोचविण्याचे काम करतात. आहारात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा. आपण आहारात फळे, संपूर्ण धान्य, निरोगी चरबी आणि भाज्या समाविष्ट करू शकता. हे पदार्थ तुमची त्वचा निरोगी ठेवतात. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

पुरेशी झोप न घेणे

आजकाल तणाव आणि खराब जीवनशैलीमुळे लोकांना नीट झोप लागत नाही. हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील हानिकारक आहे. यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. अशा वेळी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.

हानिकारक किरणे

जेव्हा आपली त्वचा हानिकारक अतिनील किरणांच्या संपर्कात येते तेव्हा ती त्वचेसाठी चांगली नसते. हे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन तंतूंचे नुकसान करते. यामुळे अगदी लहान वयातच त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा आणि सनस्पॉट्स दिसू लागतात. म्हणून हानिकारक अतिनील किरणांच्या संपर्कात येणे टाळा.

यावरील आयुर्वेदीक उपाय

- बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. पाच ते सहा बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवून सकाळी ते खा. यामुळे तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल.

- त्वचेसाठी केळं अतिशय चांगले आहे. आधी पिकलेले केळं कुस्करा. त्यात मध आणि गुलाबजल घाला. त्यानंतर त्यात दही घाला. चेहऱ्याला पेस्ट लावण्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

गुलाबपाणी, लिंबू आणि ग्लिसरिनमुळे तुमची त्वचा स्वच्छ, मुलायम आणि चमकदार होते. त्वचेला तजेला आल्यामुळे त्वचेचा सैलपणा कमी होतो.

मधात एक नैसर्गिक स्वीटनर असते ते माईश्चराईजरचे काम करते. मधामुळे फक्त सुरकुत्या दूर होतात असे नाही तर त्यातील अॅंटीऑक्सीडेंटमुळे त्वचाही हेल्दी राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT