कलिंगडाचा फेसपॅक
कलिंगडाचा फेसपॅक Esakal
लाइफस्टाइल

Watermelon थंडाव्याबरोबरच Face Pack म्हणूनही ठरेल उपयुक्त

Kirti Wadkar

कलिंगड म्हणजेच उन्हाळ्यातील अनेकांचं आवडतं फळ. मधुर रसाळ असं कलिंगड उन्हाळ्याच्या गरमीत खाणं अनेक जण पसंत करतात. भीषण गरमीत कलिंगड खाल्ल्याने शरीरात एनर्जी येते. शिवाय डिहायड्रेशनचा धोका देखील कमी होतो. Skin Care Watermelon helpful for skin care as face pack

यासोबतच कलिंगडातील Watermelon अनेक पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहित आहे का? कलिंगड खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच कलिंगडाचे त्वचेसाठी Skincare देखील अनेक फायदे आहेत.

कलिंगडमध्ये असलेलं अँटिऑक्सिडेंट, मिनरल्स आणि विटामिन्समुळे त्वचेला Skin फायदा होतो. उन्हाळ्यात सनबर्न Sunburn एलर्जी अशा त्वचेशी संबंधित  अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी कलिंगडाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो. यासाठीच आम्ही तुम्हाला कलिंगडापासून तयार करण्यात आलेले काही असे फेसपॅक सांगणार आहोत ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.

कलिंगडाचा रस कापसाच्या बोळ्याने चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याची जळजळ कमी होण्यास मदत होते. यामुळे त्वचेत नायट्रिक ऍसिडटा स्तर कमी होण्यास मदत होते. यामुळे जखम भरण्यास मदत होते. तसंच यामुळे ऍक्ने कमी होण्यास मदत होते. 

हे देखिल वाचा-

दही आणि मधासोबत कलिंगड फेसपॅक- कलिंगडाचा गर काढून त्याक एक चमचा दही आणि थोडं मध मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी. हा फेसपॅक १५ मिनिटं चेहऱ्यावर ठेवावा. मध आणि कलिंगडात असलेल्या सूज कमी करणाऱ्या तत्वांमुळे चेहऱ्यावरील ऍक्ने कमी होण्यास मदत होते.तर दही एक्सफोलिएट करण्याच काम करत. 

टोमॅटो आणि कलिंगड- तेलकट त्वचेसाठी टोमॅटो आणि कलिंगड फेसपॅक चांगल रिझल्ट देतो. यासाठी टोमॅटो आणि कलिंगडाचा पल्प चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावावा आणि चेहरा धुवून टाकावा. टोमॅटोमधील लाइकोपीन आणि कलिंगडमधील मॅलिक ऍसिड त्वचेसाठी नैसर्गिक एक्स्फोएटर म्हणून काम करतं. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि पिंपल्सची समस्या कमी होते.

कलिंगड आणि केळं- कलिंगडाचा रस आणि केळं कुस्करून पल्प तयार करावं. हा  फेसपॅक चेहऱ्याला २० मिनिटांसाठी लावून ठेवावा. यात असलेले अँटीइफ्लेमेटरी गुण ऍक्ने दूर करण्यास मदत करतात. 

कलिंगडाच्या फेसपॅकचे फायदे- 

कलिंगडमध्ये विटामिन ए आणि सी आढळतं. यामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्याच उन्हामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. सनबर्ननंतर त्वचा पुन्हा तजेलदार होण्यासाठी हा फेसपॅक उपयुक्त ठरेल.

उन्हाळ्यात घामामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते. चेहऱ्यावर धूळ आणि घाण जमा होवून  पिंपल्स येऊ लागतात. अशा वेळी कलिंकडाच्या फेसपॅकने पिंपल्सची ही समस्या दूर करणं शक्य आहे.

उन्हाळ्यात उन्हामुळे आलेली टॅनिंग घालवण्यासाठी हा फेसपॅक फायदेशीर ठरतो. 

कलिंगडाच्या फेसपॅकमुळे त्वचा आतून मॉइच्छराइज होण्यास मदत होते. 

त्वचेवरील सूज कमी करण्यासाठी कलिंगडचा फेसपॅक कामी येतो.

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरमांचे डाग असतील तर हे डाग फिके करून घालवण्यास कलिंगड फेसपॅक उपयुक्त ठरेल.

कलिंगडच्या रसामध्ये मॅलिक ऍसिड उपलब्ध असतं. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेवर चमक येते. 

त्यामुळे आता कलिंगडचा खाण्यासोबतच त्वचेसाठी देखील उपयोग सुरु करा. या नैसर्गिक उपायाने तुमची त्वचा निरोगी होवून तरुण दिसण्यास मदत होईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT